वाघाने शिकार केलेला बैल फरपटत महामार्ग ओलांडून जंगलाच्या दिशेने नेताना प्रवाशांनी प्रत्यक्ष पाहिले. Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Tiger News | चंद्रपूर–मुल मार्गावर वाघाचा थरार; शिकार केलेला बैल फरपटत नेताना महामार्ग काही काळ ठप्प

चिचपल्ली गावाजवळ प्रवाशांसमोरच वाघाने रस्ता ओलांडला; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

Tiger kills bull Chandrapur Mul Highway

चंद्रपूर: चंद्रपूर–मुल मार्गावरील चिचपल्ली गावाजवळ सोमवारी  एक थरारक प्रसंग घडला. वाघाने शिकार केलेला बैल फरपटत महामार्ग ओलांडून जंगलाच्या दिशेने नेताना प्रवाशांनी प्रत्यक्ष पाहिले. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक थांबली असून प्रवाशांनी हा प्रसंग मोबाईलमध्ये कैद केला. संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

चंद्रपूर–मुल मार्ग हा जंगलालगतचा मार्ग असल्याने या परिसरात वाघांचे दर्शन अनेकदा होत असते. चिचपल्ली गावाजवळ सोमवारी  प्रवासी नेहमीप्रमाणे या मार्गाने प्रवास करत असताना अचानक रस्त्यावर वाघ दिसून आला. वाघाने जवळच शिकार केलेला बैल फरपटत महामार्ग ओलांडून जंगलाच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली.

वाघ अचानक रस्त्यावर आल्याने काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. एसटी बस, चारचाकी वाहने आणि दुचाकीस्वारांनी सुरक्षित अंतर ठेवत आपली वाहने थांबवली. सर्वजण दूरूनच हा थरारक प्रसंग पाहत होते. वाघाने शांतपणे शिकार केलेला बैल फरपटत रस्ता ओलांडला आणि नंतर जंगलात निघून गेला.

यावेळी काही प्रवाशांनी मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये हा संपूर्ण प्रसंग कैद केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला असून सध्या तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओची परिसरात तसेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

दरम्यान, चंद्रपूर–मुल मार्ग हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतचा भाग असल्याने येथे अनेकदा वाघांचे दर्शन होत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. जंगलालगतच्या या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना अधूनमधून वाघ दिसल्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना कधी कधी जणू जंगल सफारीचा अनुभवही मिळतो.

मात्र, वाघांची वाढती हालचाल लक्षात घेता या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचेही सांगितले जात आहे. जंगलालगतच्या भागात वेग कमी ठेवणे आणि वन्यजीव दिसल्यास सुरक्षित अंतर राखणे गरजेचे असल्याचे वन्यजीव तज्ज्ञांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT