चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अस्मानी संकटामुळे मोठ्या प्रमानात पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा काढूनही त्यांना कंपनी नुकसान देण्यास टाळाटाळ करीत असल्यामूळे ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी आंदोलन केले. परंतू आंदोलनाची प्रशासन व शासनाकडून कोणतेही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आंदोलक शिवसैनिकांचा संयम सुटला. आज सोमवारी दुपारी शिवसैनिकांनी चंद्रपूर जिल्हा पीक विमा कंपनीच्या कार्यालयात धाव घेत कार्यालयाची तोडफोड केली.
शेतकऱ्यांचे वारंवार येणाऱ्या अस्मानी संकटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी आंदोलन करून जिल्हा प्रशासनाला अल्टिमेट दिला होता. शिवाय प्रशासनाने व शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल न घेतल्यास विमा कंपनीचे ऑफिस फोडू, असा इशारा देण्यात आला होता. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदोलन आज आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील महसूल मंडळांकडून अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतपीकांचे बाधितचा अहवाल देण्यात आला. अन्य मंडळांमध्येही अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पीक जमीनदोस्त झाली. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला.
अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक व शेत जमिनीची नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी केली परंतु रब्बी हंगाम सुरू होवूनही शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानाची मदत मिळालेली नाही. नुकसान भरपाईसह विविधसाठी मागण्यांसाठी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन दिले होते. आज सोमवारी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. प्रत्येक वेळी शेतकऱ्यानी पीक विमा कंपनी मध्ये नुकसान भरपाईची विचारणा केली असता त्यांना उडवाउडवी उत्तर देत होते. त्यामुळे आक्रमक होवून दि_ओरिएण्टल_इन्शोरंस पीक विमा कपंनी चंद्रपूर येथे शिवसेनेचे पदाधिकारी माहिती विचारली असता त्यांनाही उडवाउडवी चे उत्तर देत होते. त्यामुळे इन्शोरस कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. यावेळी युवासेनेचे जिल्हाधिकारी विक्रांत सहारे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सिक्कीयादव, उपजिल्हा प्रमुख शालिक फाले , शहर प्रमुख बल्लारपूर प्रकाश पाठक, माजी महानगर प्रमुख प्रमोद पाटील, तालुका प्रमुख संतोष नरुले, तालुका प्रमुख मुलं प्रशांत गट्टूवार, तालुका प्रमुख गोंडपिपरी सूरज माडूरवार, जिल्हा संघटिका उज्वला नलगे, युवतीसेना जिल्हाधिकारी रोहिणी पाटील, विनय धोबे, सुमित अग्रवाल, हेमराज बावणे, बाळू भगत, बाबा साहू, राहुल वीरूटकर, विकास वीरूटकर, संदीप गिरे तसेच युवासेनेचे पदाधिकारी व महिला आघाडी व युवती सेना कार्यकर्ते उपस्थित होते.