Sudhir Mungantiwar Viral Video:
भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार सध्या राजकीय वनवासात असल्यासाखरे आहेत. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळात संधी मिळालेली नाही. याबाबतची सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी अनेकवेळा उफाळून आली आहे. कधीकाळी भाजपमधील मुख्यमंत्री पदाचा दावेदार असलेले मुनगंटीवार सध्या फक्त आमदार म्हणून काम करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओद्वारे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. सुधीरभाऊ हे उघड दार देवा आता हे भजन म्हणताचा हा व्हिडिओ....