चंद्रपुरात डॉ. बहिणीने दिल्या रक्षाबंधनाच्या अनोख्या शुभेच्छा Pudhari Photo
चंद्रपूर

चंद्रपूर : बहिणींनो स्वतःची सुरक्षा स्वतः करा; राखीच्या भरवश्यावर राहू नका!

पुढारी वृत्तसेवा

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ९ ऑगस्टच्या मध्यरात्री एका डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. या क्रूर घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. डॉक्टर संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. याच घटनेचा निषेध म्हणून चंद्रपूरतील एका महिला डॉक्टरने हातात फलक घेवून "केवळ राखीच्या भरवश्यावर राहू नका,स्वताची सुरक्षा स्वतः करा" अश्या शुभेच्छाचा दिल्या आहेत. संदेश फलक हातात घेऊन मुख्य मार्गाचा मध्यभागी उभ्या राहुन महिला डॉक्टरने शहरवासियांचे लक्ष वेधले. हिना झाडे असे या डॉक्टर महिलेचे नाव आहे. गडचांदूर शहरात त्याचे खाजगी क्लिनिक आहे.त्यांचे फोटो, विडिओ समाज माध्यमात व्हायरल झाले आहेत.

भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधनाच्या सण आहे. आपल्या लाडक्या भावाला ओवाळणी करण्यात बहीण व्यस्त असताना चंद्रपूर जिल्हातील गडचांदुर येथील डॉक्टर बहीण मात्र अत्याचाराची बळी ठरलेल्या आपल्या बहिणीला न्याय मिळावा यासाठी संदेश फलक हातात घेऊन मुख्य मार्गावर उभी होती. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीसाठी पवित्र सण. संकटात सापडलेल्या बहिणीची रक्षा करायला भाऊ धावून येईल अशी आशा प्रत्येकच बहिणीला असते. मात्र या डॉक्टर महिलेने केवळ राखीच्या भरवश्यावर राहू नका, स्वतःची सुरक्षा स्वतः करा असा संदेश दिला आहे.

संदेश फलकावर काय लिहिलं...

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा...निव्वळ राखीच्या भरोशावर नका राहू, माता बहिणींनो. स्वतःची रक्षा स्वतः करा. कारण जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येईल ना, तेव्हा गुन्हेगार बाहेर फिरणार आणि दोषी तुम्हाला ठरवल्या जाणार. चंद्रपुरातील या बहिणींने कल्लकत्ता येथील घटनेचा तीव्र संताप व्यक्त करीत निषेध व्यक्त केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT