चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात आढळले दुर्मिळ काळवीट

backup backup

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा :  जगात अतिशय दुर्मिळ आणि केवळ भारतीय उपखंडात आढळणारे काळवीट हरीण चंद्रपूर जिल्ह्या सुमारे दीडशेच्या संख्येत आहेत. परंतु ते असंरक्षित क्षेत्रात आढळत असल्याने त्यांच्या सुरक्षेतचा प्रश्न एैरणीवर आला आहे. जिल्ह्यातील भद्रावती, कोरपना आणि चंद्रपूर तालुक्यातील विरळ जंगलात शेताशिवारता अधिवास असलेल्या सुंदर प्राण्यांसाठी रेहकुरी काळवीट अभयारण्याच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा काळवीट साठी काम्मुनिटी रीझर्व, कन्झर्वेशन रिझर्व किंवा अभयारण्य घोषित करावे अशी मागणी पर्यावरण आणि वन्यजीव अभ्यासक प्रा सुरेश चोपणे यांनी वनमंत्री मा सुधीर मूनगंटीवार, राज्याचे वनसचिव, मुख्य वनसंरक्षकांकडे केली आहे. वन्यजीव अभ्यासक प्रा सुरेश चोपणे यांनी काल बुधवारी कोरपना तालुक्यातून दोन काळविटांचे फोटो व व्हिडीओ कॅप्चर केला आहे.

दहा वर्षापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात काळवीट नाही, असे सांगितले जात होते. परंतु ते भद्रावती तालुक्यात दिसले. तेव्हापासून कोरपणा, चंद्रपूर तालुक्यात आढळून आले होते. अधिवास असेल्या क्षेत्रात गावकरी, शेतकरी व वन विभागाच्या स्थानिक कर्मचारी यांनी संरक्षणाकउे लक्ष दिल्याने जिल्ह्यात सुमारे दिडशेच्या संख्येत असल्याचा अंदाज लावल्या जात आहे. देशात काळविटांची होत असलेली शिकार, कमी संख्येत प्रजनन, नैसर्गिक मृत्यू, मांसाहारी प्राण्याची शिकार आणि असंरक्षित क्षेत्रात अधिवास आदी विविध कारणामुळे चंद्रपूर जिल्ह्यात आढळणाऱ्या दुर्मिळ काळवीटांच्या संरक्षणाविषयी शंका निर्माण होत आहे. राज्य सरकार व वन विभागाने त्यांचे अधिवास क्षेत्रात काळविटांचे सर्वे करणे, संरक्षणासाठी उपाययोजना करणे, किंवा अभयारण्य ,कम्युनिटी, कन्झर्वेशन रिझर्व घोषित करण्याची मागणी केली आहे. याकडे दुर्लक्ष केले तर सारस आणि माळढोक पक्षांप्रमाणे काळविट जिल्ह्यातून नामशेष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काळवीट हे हरीण प्रजातीचे वाटले तरी ते अन्टेलोप आहेत. (Antelope Cervicapra ) त्यांना इंग्रजीत ब्लेक बक आणि संस्कृत मध्ये कृष्ण मृग म्हणतात. अनेक ठिकाणी त्यांना गझेल असेही म्हणतात. ते भारतात संख्येने जास्त असले तरी ते धोकादायक वर्गात मोडतात. नरांना काळी पाठ आणि शिंगे असतात तर मादी भुऱ्या रंगाची असते. ती वर्षातून २ पिले देतात. ते ८० किमी गतीने धावू शकतात आणि १० फुट उंच उडी मारू शकतात. प्राचीन ग्रंथात कृष्ण मृगाणा चंद्र आणि वायू देवतेचे वाहन मानल्या जात होते आणि त्यांना पवित्र महान पूजले जात होते. चंद्रपूर जिल्ह्यात वन विभागाचे वन्यजीव संरक्षण चांगले असले तरी काळवीट हे लाजरे जीव असल्याने ते सहसा दिसत नाही, परंतु ते शेती आणि उघडे वन,गवताळ भागात राहणे पसंत करतात. त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. वन विभागाने काळवीटाणा ताडोबा बफर किंवा कोअर मध्ये स्थानांतर केले तर त्यांचे उत्तम संरक्षण होऊन पर्यटकांना शुध्दा सुंदर काळविटांचे दर्शन होणार आहे. वन्यजिव अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी मागील चार वर्षापासून जिल्ह्यातील काळविटांवर लक्ष ठेवून असून त्यांच्या संरक्षणाची मागणी करीत आहे. राज्यात १९८० मध्ये कर्जत जवळ रेहकुरी येथे लहानसे ,एकमेव काळवीट अभयारण्य आहे. त्याच धर्तीवर चंद्रपूर येथे अभयारण्य व्हावे अशी अशी मागणी वन्यजीव अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT