राजूरी तालुक्यातील बेरोजगारांनी बुद्धा कंपनीवर धडक मोर्चा काढला. Pudhari Photo
चंद्रपूर

राजूरी तालुक्यातील बेरोजगारांचा बुद्धा कंपनीवर धडक मोर्चा

परप्रांतातील कामगारांऐवजी प्रभावित गावांतील युवकांना रोजगार देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : वेकोलीच्या बल्लारपूर एरिया अंतर्गत गोवरी नजीकच्या बुद्धा कंपनीमध्ये परप्रांतातील कामगारांऐवजी जवळपासच्या प्रभावित गावांतील युवकांना रोजगार देण्यात यावा या मागणीसाठी राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा काँग्रेसचे नेते उमाकांत धांडे यांच्या नेतृत्वात कंपनीवर धडक देण्यात आली. यावेळी कंपनीच्या व्यवस्थापकाची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.

एक आठवड्याच्या मुदतीत याबाबत निर्णय घेऊन साखरी, चार्ली, निर्ली, धिडशी, पोवणी, कढोली, गोवरी, पेल्लोरा, मारडा,नवेगाव, वरोडा येथील युवकांना प्राधान्य देण्यात यावे अन्यथा परिसरातील गावकरी, बेरोजगार युवकांच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येईल, अशी सूचना व्यवस्थापनाला देण्यात आली. याप्रसंगी चार्लीचे सरपंच विजय निवलकर, वरोडा चे सरपंच सिद्धार्थ कातकर, सुरेश पोडे,माजी उपसरपंच किशोर ढुमणे, गंगाधर ढवस, युवक काँग्रेसचे रवींद्र करमणकर, प्रदीप दुबे, संजय उमरे, श्रीकांत उरकुडे, राहुल कौरासे, मयूर थिपे, निखील तुमाने, केतन धांडे, पंकज दुबे, करण बेसुरवार, प्रकाश कोडापे, संदीप ताजने आदींसह शेकडो युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT