चंद्रपूर : बाबा आमटे यांचे वाहनचालक काशिनाथ शिव यांच्या 'वटवृक्षाच्या छायेखाली' या पुस्तकाचे प्रकाशन आज गुरुवारी वरोरा येथील आनंदवनात डॉ. विकास आमटे यांच्या उपस्थितीत पार पडले. श्रध्देय बाबा आमटे प्रसिद्धीपासून दूर होते. ते नेहमी म्हणत,माझ्यावर चित्रपट काढण्यापेक्षा माझ्या माणसांवर काढा ,तसा बायोपिक काशिनाथ सारख्या सहका-यांवर काढावा, माझ्यावर नको," अशी इच्छा आनंदवनाचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ गझलकार प्रदीप निफाडकर, लातूरचे इतिहास अभ्यासक डॉ. सोमनाथ रोडे,अमरावतीचे लेखक डॉ.गोविंद कासट, आनंद निकेतन महाविद्यालयाचे निवृत्त प्रा.श्रीकांत पाटील वरो-याचे आचार्य ना.गो.थुटे व तपोवन - अमरावतीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई होते. डॉ. विकास आमटे यांच्या ७७ व्या वाढदिवसाचे निमित्त साधून हा प्रकाशन समारंभ झाला. विविध वक्ते, साहित्यिक आणि संस्था तर्फे डॉ.आमटे यांना शुभेच्छा देऊन सत्कार केला. डॉ. विकास आमटे म्हणाले, "काशिनाथ यांच्या सारख्या आनंदवनातील लोकांना मी गूरू मानतो, या लोकांनी आम्हाला खूप आमच्या प्रसिद्धीपेक्षा या लोकांना प्रकाशात आणायला हवे.
निफाडकर यांनी "आजचा समारंभ म्हणजे दिवाळी पूर्वीचे अभ्यंगस्नान आहे. हे एका प्रमाणिक माणसाचे पुस्तक आहे. पण त्याहीपेक्षा या पुस्तकाचे महत्व हे आहे की एका कन्नड माणसाने ९० व्या वर्षी मराठीत पुस्तक लिहीले व ते मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचे सर्वात सुंदर पुस्तक आहे. विकासभाऊंकडे आठवणींचा खजिना आहे. अनेक साहित्यिकांची पत्रे आहेत.त्या विषयी बोलताना निफाडकर यांनी सांगितले ‘वाढदिवसाच्या पूर्व संध्येला पूर्व संध्येला कालच मान्यता दिली आहे. भाऊंच्या पुढच्या वाढदिवशी ते यावे अशी व्यवस्था करण्यात येईल’ डॉ.सोमनाथ रोडे यांनी पुस्तकाचे विवेचन केले. सुत्रसंचलन अधिकक्ष रविंद्र नलगिंटवार यांनी केले. तर आभार प्रा. तानाजी बायस्कर यांनी मानले.