mother hanged herself after poisoning her 9 month old baby in chandrapur
९ महिन्यांच्या बाळाला विष पाजून आईने जीवन संपवले Pudhari Photo
चंद्रपूर

९ महिन्यांच्या बाळाला विष पाजून आईने जीवन संपवले; सासरच्यांवर हत्‍येचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा

वरोरा तालुक्यातील शेगाव (बु.) येथील एका (27 वर्षीय) महिलेने आपल्या 9 महिन्याच्या बाळाला विष पाजून स्वतः गळफास घेवून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना (शुक्रवार) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. पल्लवी मितेश पारोधे (वय 27) असे मृत मातेचे नाव असून. स्मित मितेश पारोधे हे बाळ चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथील पारोधे कृषी केंद्राचे संचालक नितेश पारोधे यांचे दोन वर्षांपुर्वी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील पल्लवी विनोद ढोके या युवतीसोबत रितिरिवाजाप्रमाणे लग्न झाले. त्यांना 9 महिन्याचा स्मित नावाचा मुलगा आहे. काल (शुक्रवार) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मितेश पारोधे यांचा 9 महिन्यांचा मुलगा घरात बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत पडलेला होता. तर पत्नी पल्लवी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. सदर घटनेची माहिती शेगाव पोलिसांना देण्यात आली. 

9 महिन्याच्या बाळावर उपचार सुरू

ठाणेदार योगेंद्र सिंह यादव यांनी, तात्काळ घटनास्थळ गाठले आणि पंचनामा करीत पत्नी पल्लवीचा मृत्तदेह  ताब्यात घेतला. तर 9 महिन्याच्या बाळाला तत्काळ वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आले. त्याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले. महिलेचे जीवन संपवण्याचे कारण कळू शकलेले नाही. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव पोलीस करित आहेत.

मुलीची हत्‍या केल्‍याचा वडीलांचा आराेप

दरम्‍यान माझ्या मुलीची हत्या केल्‍याचा आरोप मुलीचे वडील विनोद श्रीहरी ढोके यांनी केला आहे. मुलीच्या लग्नानंतर काही महिन्यातच सासर कडून तिला शारीरिक व मानसिक त्रास सुरु झाला होता. तिने याबद्दल आम्हाला सांगितले होते. पण आम्ही तिला समजावून सांगत होतो. नातू झाल्यानंतर आता तरी चांगले राहतील असा विश्वास होता. मात्र दिवसेंदिवस तिला सासर कडून पैशासाठी नेहमी त्रास दिला जात होता. माझ्या मुलीने जीवन संपवले नसून सासरच्यांनी तीची हत्याच केल्याचा आरोप मुलीचे वडील विनोद श्रीहरी ढोके यांनी केला.

पती नितेश व दिर रितेशला अटक

मुलगी पल्लवी हिने जीवन संपवले नसून सासरच्या लोकांनी तिची हत्याच केली आहे असा गंभीर आरोप मुलीचे वडील विनोद श्रीहरी ढोके यांनी केला. त्‍यांनी या विषयी शेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वडीलांच्या तक्रारीवरून पल्लवीच्या मृत्यूस जबाबदार धरून शेगाव पोलीसांनी पती नितेश पारोधे  व दीर रितेश पारोधे या दोघांना अटक केली आहे. पती व दीराच्या चौकशीनंतर पल्लवी हिच्या मृत्यूचे कारण पुढे येणार आहे. मात्र महिलेने जीवन संपवले की तीची कुणी हत्या केली याचा शोध मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर शेगाव पोलीसांनी सुरू केला आहे.

SCROLL FOR NEXT