चंद्रपूर : सावली तालुक्यातील व्याहाड बूज जवळील वैनगंगा नदीत गडचिरोली येथील मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसचे ३ विद्यार्थी बुडाले. आज शनिवारी (१० मे) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गोपाल गणेश साखरे (वय 20, रा. चिखली, जि. बुलढाणा) पार्थ बाळासाहेब जाधव (वय २०, रा. शिर्डी, जि. अहमदनगर), स्वप्निल उद्धवसिंग शीरे ( वय २०, संभाजीनगर, औरंगाबाद) अशी बुडलेल्यांची नावे आहेत.
गडचिरोली येथील मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असलेले ६ विद्यार्थी आज शनिवारी कॉलेजला सुट्टी असल्यामुळे सावली तालुक्यातील वैनगंगा नदीत पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. गोपाल गणेश साखरे, पार्थ बाळासाहेब जाधव, स्वप्निल उद्धवसिंग शिरे, शिवम श्रीधर जायभाई, सार्थक राजेश पाठक, सुजित धनाजी देशमुख अशी त्यांची नावे आहेत. ते आंघोळ करत असताना सायंकाळी चारच्या सुमारास त्यांच्यापैकी गोपाल गणेश साखरे (वय 20, रा. चिखली,जि.बुलढाणा)पार्थ बाळासाहेब जाधव ( वय २०, रा. शिर्डी , जि. अहमदनगर), स्वप्निल उद्धवसिंग शीरे (वय २०, संभाजीनगर ,औरंगाबाद) हे तिघे जण वैनगंगा नदीत बुडाले असल्याची माहिती अन्य तिघा विद्यार्थ्यांनी दिली.
लगेच सावली पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी शोध म्हणून राबवली. मात्र सायंकाळी तिघांचे मृतदेह मिळालेल्या नाहीत. उद्या परत सकाळी शोध म्हणून राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.