चंद्रपूर : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिले. त्या अनुषंगाने आज मंगळवारी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.
मंगळवारी (दि.२८) पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी बल्लारपूर पोलीस ठाणे येथे भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येक खात्यानी १०० दिवसाचा आराखडा तयार करुन प्रभावी कामगिरी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने जनतेच्या तक्रारी ऐकून त्या निवारण करण्याकरिता तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला. पोलीस अधिक्षक यांनी पोलीस ठाणे बल्लारपुर येथे भेट देवून शांतता कमिटीची बैठक घेतली. सामाजिक सलोखा योग्य प्रकारे राखला जाईल याबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या. सदर शांतता कमिटी बैठकी करिता पोलीस ठाणे बल्लारपुर येथील सर्व शांतता कमिटी सदस्य हजर होते. त्यानंतर पोलीस पाटील यांचीही बैठक घेवून त्यांना मार्गदर्शन केले.