चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये लग्नाचे आणि पैशाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांपैकी संदिप खांदेकर (वय. 23) यास अटक केली आहे. तसेच प्रवीण दाभेकर (वय 34), विक्की गोरवे (वय 27), प्रज्वल गोडेकर (वय 25) हे तिघे पसार आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावामध्ये सात ते आठ महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर गावातीलच चार आरोपींनी लग्नाचे व पैशाचे अमिष दाखवून घरी एकटीच असल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार केला. सदर अल्पवयीन मुलीला मासिक पाळी येणे बंद झाल्यामुळे तिची नुकतेच एका खाजगी रुग्णालयामध्ये वैद्यकिय तपासणी केली. यामध्ये ती सात महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर अल्पवयीन मुलीने आपल्या आईसोबत चिमूर पोलीस ठाण्यात जावून तोंडी रिपोर्ट दाखल केली. सदर तक्रारीवरून चिमूर पोलिसांनी अत्याचार प्रकरणात समाविष्ट आरोपींविरोधात बलात्कार पॉक्सो आणि विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.
चौघां आरोपींपैकी संदिप खांडेकर यास अटक केली असून तिघे आरोपी पसार आले आहेत. पोलिसांनी त्यांची शोध मोहीम सुरु केली आहे. या प्रकरणाचा तपास चिमुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संतोष बाकल करीत आहेत.