चंद्रपूर : वरोरा येथे अवैध सट्टापट्टी वर धडक कारवाई करून वेगवेगळ्या ११ गुन्ह्यात १२ आरोपींना ताब्यात घेवून एकूण ४ लाख २२ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने आज शनिवारी (दि.१५) केली.
पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन यांनी चंद्रपुर जिल्हात जुगार, प्रोव्हीशन रेड तसेच अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद भूरले, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, पोलीस उपनिरीक्षक सुनिल गौरकार व पोलीस स्टाफ यांचे वेगवेगळे पथक तयार करून पोलीस स्टेशन, वरोरा शहरात विविध ठिकाणी मोठया प्रमाणात सुरू असलेल्या अवैधरित्या सट्टापट्टी वर वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून सट्टापट्टी चालविणाऱ्या एकुण १२ इसमाना ताब्यात घेवुन त्यांचेवर वरोरा पोलीस स्टेशन येथे वेगवेगळे ११ गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून नगदी रूपये २२ हजार ८२० रुपये व ८ मोटार सायकल किंमत ४ लाख रुपये असा एकूण ४ लाख २२ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.
सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद भूरले, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकार, पोलीस उपनिरीक्षक सुनिल गौरकार व पोलीस स्टॉफ सर्व स्थानिक गुन्हे शाख, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली.