बल्लारपूर येथील गोडावूनमधून जप्त केलेला मुद्देमाल  
चंद्रपूर

चंद्रपूर : बल्लारपुरात सुगंधित तंबाखूच्या गोडावूनवर छापा; ५ लाखाचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; एकाला अटक

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : सुगंधित तंबाखूची साठवणूक करून ठेवलेल्या गोडावूनवर स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (दि.८) दुपारी छापा टाकत पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून हरीष अंबाराम ठक्कर (रा. मानोरा, बल्लारपूर) असे या संशयिताचे नाव आहे.

बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथे एका गोडावूनमध्ये सुगंधीत तंबाखू साठवणूक करून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने मंगळवारी मानोरा येथील गोडावूनवर छापा टाकत सुंगधित तंबाखूसह ५ लाख ६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला याप्रकरणी हरीष ठक्कर याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधिक्षक मुग्मका सुदर्शन,अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलिस उपनिरीक्षक मधुकर चंद्रया सामलवार, धनराज करकाडे, सुरेंद्र महतो, चेतन गज्जलवार, प्रफुल गारघाटे, मिलींद ठेकान यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT