father and son killed neighbor
किरकोळ भांडणातून शेजाऱ्याचा खून  File Photo
चंद्रपूर

चंद्रपूर : किरकोळ भांडणातून बाप लेकाने केला शेजाऱ्याचा खून

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : किरकोळ भांडणातून बाप लेकाने शेजाऱ्याचा कुऱ्हाडीने निर्घृणपणे खून केल्याची घटना शनिवारी (दि.७) मुल तालुक्यातील हळदी गावात घडली. या घटनेनंतर मुल पोलीसांनी वडील गुरूदास नकटू पिपरे (वय ५०), मुलगा सुरज गुरूदास पिपरे (वय २१) यांना अटक केली आहे. राजू शेषराव बोदलकर (वय ३०) असे मृत्त व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, मूल तालुक्याच्या ठिकानापासून आठ किमी अंतरावर हळदी हे गाव आहे. राजू आणि आरोपी हे शेजारी राहतात. राजूच्या  घरा जवळून विद्युत तार गेली होती. ती वायर बाजूला करून दुस-या ठिकाणावर नेण्याची विनंती गुरूदास पिपरे यांनी केली होती.  त्याच कारणावरून आरोपी आणि राजू यांच्यात भांडण झाले होते. राजू व वडिल गुरूदास नकटू पिपरे यांच्यामध्ये सूरू असलेले भांडण सुरज पिपरे याने ऐकले. राजूच्या घराजवळ येवून रागाच्या भरात हातातील कु-हाडीने  राजूच्या मानेवर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळयात पडलेल्या राजूचा  घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना वा-या सारखी पसरताच गावात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी झाली.

राजू हा गावात अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाचा होता. त्याला पत्नी ,एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या प्रकरणी आरोपी मुलगा सुरज गुरूदास पिपरे, वडील गुरूदास नकटू पिपरे या बापलेकास पोलिसांनी अटक केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी भगत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक सुमित परतेकी करीत आहेत.

SCROLL FOR NEXT