प्रातिनिधिक छायाचित्र  (File Photo)
चंद्रपूर

Chandrapur Tiger Attack | भय इथले संपत नाही: आंबे गोळा करताना वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार; मुल तालुक्यातील सातवा बळी

महिनाभरात १२ जणांचा बळी, मृताच्या कुटुंबियांना २० हजारांची तातडीची मदत

पुढारी वृत्तसेवा

Elderly killed by Tiger in Mool Taluka

चंद्रपूर : आंबे गोळा करण्याकरीता गेलेल्या सोमनाथ प्रकल्पातील आमटे फार्म हाऊसमधील एका 65 वर्षीय वृद्ध वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना सोमवारी ( दि. 9 ) सकाळी उघडकीस आली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील मारोडा बिटात कम्पांटमेंट 792 मध्ये ही घटना घडली. जयदेव पोतलू करनकर असे मृतकाचे नाव आहे. वनविभागाने मृतकाचे कुटुंबियांना 20 हजारांची तातडीची मदत केली आहे. 10 मे पासून आता पर्यंत जिल्ह्यात बारा जणांचा मृत्यू झाला असून एकट्या मुल तालुक्यातील हा सातवा बळी ठरला आहे.

मुल तालुक्यातील मारोडा येथे आमटे कुटूंबियांचे सोमनाथ नावाने प्रकल्प आहे.याच परिसराला लागून ताडोबाचे बफर झोनम आहे. या परिसरात आंब्याची बाग आहे. याबागेमध्ये सोमनाथ प्रकल्पातील निवासी जसदेव पोतलू गकरनकर हा रविवारी सायंकाळी चार वाजताचे सुमारास आंबे गोळा करण्याकरीता मारोडा बिटातील कंपार्टमेंट क्रं. 792 मधील जंगलात गेला होता. त्याच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने 65 वर्षीय इसमावर हल्ला केला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.याच परिसरात हाकेवर सोमनाथ सफारी प्रवेशद्वार आहे. सायंकाळी होऊनही जयदेव घरी परत न आल्याने पत्नीने सोमनाथ प्रकल्पाचे व्यवस्थापक अरूण कदम जावून सांगितली.

त्याचवेळी वाघांच्या हल्यात ठार झाल्याचा संशय बळावल्याने तत्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली. रविवारी सायंकाळी वनविभाग व प्रकल्पाच्या कार्यकर्त्यानी त्याची शोध राबविल, परंतु त्याचा पत्ता लागला नाही. रात्र झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. काल सोमवारी सकाळी पुन्हा बेपत्ता इसमच्या शोधासाठी शोधमोहिम सुरू करण्यात आली. दरम्यान त्याच परिसरातील नाल्याजवळ जयदेवच्या शरीराचा एक अवयक आढळून आला. त्यानंतर काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला. वाघाने त्याला ठार केल्यानंतर घटनास्थळापासून त्याला फरफटत नेल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्याच्या शरीराचा बराचसा भाग वाघाने खाल्ला.वनाधिकाऱ्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनाकरीता मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविले.

जयदेव पोतलू करनकर हा सोमनाथ प्रकल्पातील जुना कार्यकर्ता होता.मागिल चाळीस पन्नास वर्षापासून प्रकल्पामध्ये काम करीत होता. सोमनाथ प्रकल्पातील दुध डेअरी विभाग तो सांभाळायचा. बगिच्यातील आंबे वेचायला जाणे हे त्याच्या जीवावर बेतले. त्याला पश्चात पत्नी आणि मूले आहेत. त्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांना भरघोष मदत देण्याची मागणी सोमनाथ प्रकल्पाचे व्यवस्थापक आणि महारोगी सेवा समिती वरोराचे विश्वस्त अरूण कदम यांनी केली आहे.

10 मे पासून आज 10 जून पर्यंत महिनाभराच्य कालावधीत 12 जणांचा वाघाच्या हल्यात बळी गेला आहे. त्यापैकी 7 जण हे जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेले होते. तिघे जण जनावरे चारण्यासाठी केले होते.तर एक महिला जंगलात सरपण आणण्यासाठी गेली होती्. आज आंबे गोळा करण्यासाठी गेला होता.

नागरिकांकडून वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी सतत होत असतानाही वनविभाग उपाययोजना आखत असला तरी वाघांचा बंदोबस्त करण्यास अपयशी ठरला आहे. दर दिवशी सामान्य नागरिकांचे बळी जात आहेत. नेत्यांच्या बैठकांवर बैठका होत आहेत. प्रशासन वाघांचा बंदोबस्त करीत असल्याच्या वल्ग्ना करीत असला तरी दरदिवशी होणाऱ्या घटनांची त्यांच्या दाव्यांची पोलखोल होत आहे. 10 मे ते आज 10जून या महिनाभराच्या कालावधीत 12 जणांचे बळी गेले आहे.

महिनाभरात 12 जणांचा बळी

10 मेला सिंदेवाही तालुक्यातील एकाच दिवशी 3 महिलांचा मृत्यू

11 मे ला मुल तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू

12 मे ला मुल तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू

14 मे ला चिमूर तालुक्याती एका महिलेचा मृत्यू

18 मे ला नागभिड व मुल तालुक्यातील दोघा इसमांचा मृत्यू

22 मे ला पुन्हा मुल तालुक्यातील एकाचा मृत्यू व एक जखमी

27 मे ला पुन्हा मुल तालुक्यातील एक महिला व एक पुरूष अशा दोघांचा मृत्यू झाला. तर

आज 10 जून ला मुल तालुक्यातीलच एका इसमाचा मृत्यू झाला आहे.

महिनाभरात 12 जणांचे बळी गेले आहेत. त्यांचे कुटूंबिय पोरके झाले आहेत. बहुतांश घरचे कर्ते असल्याची माहितीही समोर येत आहे.

बफर झोनमध्ये टी 87 वाघाचे अस्तित्व

मूल तालुका बफर,प्रादेशिक,सामाजिक आणि वनविकास महामंडळाच्या जंगलाने व्यापलेला आहे. चारही बाजूने वाघाचे अस्तित्व आहे. त्याशिवाय अन्य वन्यप्राणी शुध्दा कार्यरत आहेत. मागील काही दिवसांपासून बफर क्षेत्रातील करवन आणि काटवन परिसरात गस्तीवर असलेल्या वन कर्मचा-यांना टी-87 या वाघाचे दर्शन होत आहे. या टी-87 वाघाला जेरबंद करण्याचे आदेश वनविभागाने दिले आहेत. परंतु सदर वाघ वनविभागला हुलकावणी देत आहे. याच वाघाने आजचा बळी घेतल्याचा संशय वनविभागाने व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT