चंद्रपूर : काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या खा. श्रीमती सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी तसेच काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांविरुद्ध सत्तेचा दुरुपयोग करून केंद्रातील मोदी सरकार आकसपूर्ण कार्यवाही करीत असल्याच्या निषेधार्थ आज शुक्रवारी (दि.18) चंद्रपूर शहरात काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोदी सरकार विरोधात निदर्शने करून निषेध करण्यात आला.
काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या खा. श्रीमती सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी व काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांविरुद्ध सत्तेचा दुरुपयोग करून केंद्रातील मोदी सरकार आकसपुर्ण कार्यवाही करीत आहेत. मोदी सरकारचा ही भूमिका लोकशाही परंपरेला घातक आहे. लोकसभेत प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्यांवर सुडबुद्धीने कार्यवाही करुन जनसामान्यांचा आवाज दडपण्याचा हा डाव आहे असा आरोप करून चंद्रपूर जिल्हा व शहर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी निदर्शने करून निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यामार्फत राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांना निवेदन देण्यात आले. चंद्रपूर जिल्हातील जनसामान्यनागरिक व कार्यकर्ते यांची न्याय्य मागणी लक्षात घेऊन सदर नेत्यांवरील आकसपुर्ण कार्यवाही थांबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर काँग्रेसचे निरिक्षक आ. अभिजित वंजारी, जिल्हा प्रभारी मुजीब पठाण, जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, महिला जिल्हाध्यक्षा सुनंदाताई धोबे, शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, प्रदेश सचिव विनोद दत्तात्रय, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, राजेश अडुर, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष सफाक शेख, प्रवीण पडवेकर, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदाणी, अरुण धोटे, सुनीता लोढीया, सुनीता अग्रवाल, चंदाताई वैरागडे, नंदू नागरकर, अँड. विजय मोगरे, दिनेश चोखारे, उमाकांत धांडे यासह चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.