Dead body found :  Pudhari File Photo
चंद्रपूर

Chandrapur Woman Body Found | वरोरा रेल्वे स्थानकावरून बेपत्ता वृद्धेचा मृतदेह नंदोरीजवळ आढळला

मुलीसोबत बल्लारपूर येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या

पुढारी वृत्तसेवा

Warora Missing Woman Body Found

चंद्रपूर : वरोरा रेल्वे स्थानकावरून बेपत्ता झालेल्या ६९ वर्षीय ललिता दत्तात्रय लोणारे यांचा मृतदेह चंद्रपूर-नागपूर मार्गावरील नंदोरी टोलनाक्याजवळ पुलाखालील नाल्यात आढळून आल्याने खळबळ उडाली.

ललिता लोणारे या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे मुलासोबत राहत होत्या. मुलीसोबत बल्लारपूर येथे जाण्यासाठी त्या २४ ऑगस्टच्या रात्री मुलासह घरातून निघाल्या होत्या. सोमवारी सकाळी सुमारे ८ वाजता त्या वरोरा रेल्वे स्थानकावर पोहोचल्या. यावेळी त्यांचा मुलगा झोपेत असल्याने त्या कधी रेल्वे स्थानकावरून निघून गेल्या, याची त्याला माहिती झाली नाही.

मुलगा जागा झाल्यानंतर आईचा शोध घेण्यात आला. मात्र बराच शोध घेऊनही त्या सापडल्या नाहीत. त्यामुळे सोमवारी वरोरा पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, गुरुवारी नंदोरी टोलनाक्याजवळ पुलाखालील नाल्यात वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक मनीष तळेवार आणि पोलीस हवालदार महेश गावतुरे घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी मृतदेह नाल्यातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकानेही पाहणी करून आवश्यक पुरावे तपासले. वृद्ध महिलेचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT