Chandrapur Vandhali Youth Death
चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील माढळी जवळील वंधली येथे १८ वर्षीय तरुणाने घरातील आढ्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन जीवन संपविले. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.२०) सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साहिल हनुमान कन्नाके (वय १८) हा सकाळी शेतात फवारणी करण्यासाठी जाण्याच्या तयारीत होता. घरातील सदस्यांचे लक्ष नसल्याची सुमारे पंधरा मिनिटांची संधी साधून त्याने घरातील आढ्याला नायलॉनची दोरी लटकवून गळफास घेतला.
दरम्यान, साहिल हा मागील चार दिवसांपासून काहीसा तणावात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याने टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.