Crime Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Crime : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गोंडपिपरी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून उपविभागीय दंडाधिकारी, गोंडपिपरी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. दंडाधिकाऱ्यांनी हद्दपारीचे आदेश जारी केल्यानंतर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अशफाक मस्तान कुरेशी (वय ४३, रा. गोंडपिपरी) आणि सुंदरसिंग ऊर्फ सुलविंदरसिंग तेजासिंग डांगी (वय २३, रा. जोगापूर, ता. गोंडपिपरी) यांचा समावेश आहे.

अशफाक मस्तान कुरेशी याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ (अ) व (ब) अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव गोंडपिपरी पोलिसांनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर संबंधिताला सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी आदेशाची अंमलबजावणी केली.

त्याचप्रमाणे सुंदरसिंग ऊर्फ सुलविंदरसिंग तेजासिंग डांगी याच्याविरुद्धही याच कायद्यांतर्गत हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या आधारे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी त्यालाही सहा महिन्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. गोंडपिपरी पोलिसांनी या आदेशाची बजावणी केली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पवार यांनी ही माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT