Chandrapur Tiger Attack Pudhari Photo
चंद्रपूर

Chandrapur Tiger Attack | वरवट येथे तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिलांवर वाघाचा हल्ला; महिला गंभीर जखमी, जिल्ह्यात दुसरी घटना

Chandrapur Tiger Attack | वरवट येथे तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिलांवर वाघाचा हल्ला; महिला गंभीर जखमी, जिल्ह्यात दुसरी घटना

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Tiger Attack on womens

चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवसात वाघाने लागोपाठ दोन मोठे हल्ले केल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय. सिंदेवाहीमध्ये तब्बल ४ महिलांचा बळी घेतल्यानंतर, आता चंद्रपूर तालुक्यातील वरवट येथे एका महिलेवर वाघाने थरारक हल्ला केला आहे.

आज सकाळी वरवट येथील योगिता चंद्रपाल जेंगठे या इतर महिलांसोबत ताडोबा बफर झोन मधील जंगलात तेंदूपत्ता गोळा करत होत्या. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक योगिता यांच्यावर झडप घातली. वाघाचा हा जीवघेणा हल्ला पाहून तिथे उपस्थित असलेल्या इतर महिलांनी मागे न हटता एकजुटीने प्रचंड आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.

महिलांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे आणि गोंधळामुळे वाघाने तिथून जंगलात पळ काढला. या भीषण हल्ल्यात योगिता जेंगठे या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT