Chandrapur Teacher Accident
सावली येथे बसस्थानक चौकात ट्रक व दुचाकी अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाला.  Pudhari News Network
चंद्रपूर

चंद्रपूर: ट्रक- दुचाकी अपघातात शिक्षकाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर: पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर-गडचिरोली मुख्य मार्गावरील सावली येथील बसस्थानक चौकात ट्रक व दुचाकी अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.३०) सकाळी साडेहदाच्या सुमारास घडली. मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकाचा निळकठं शेडमाके असे नाव आहे.

चंद्रपूर-गडचिरोली मुख्य मार्गावर सावली वसलेले आहे. मुख्य मार्गावरच सावलीचे बसस्थानक आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास चंद्रपूर वरून गडचिरोलीकडे सिमेंट भरलेला ट्रक जात होता. याच ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. भीषण धडकेत शिक्षक निलकंठ शेडमाके दुचाकीवरून कोसळले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

या घटनेनंतर नागरिकांनी शेडमाके यांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. उपचारादरम्यान शेडमाके यांचा मृत्यू झाला. शेडमाके हे सावली तालुक्यातील कढोली येथील आश्रम शाळेत शिक्षक होते. ते मूळचे सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथील होते. 15 वर्षापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदची निवडणूकही लढलेली होती. त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.

SCROLL FOR NEXT