चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : ताडोबात सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना भूरळ घालणारी ताडोबाची राणी माया वाघीण दोन महिन्यापासून बेपत्ता झाली आहे. या काळात पर्यटकांना तिचे दर्शन झाले नाही. ती बेपत्ता झाली आहे की तिचे सोबत काही घातपात झाला आहे ,असे विविध तर्कवितर्क पर्यटकांमध्ये लावल्या जात आहे. तर दुसरीकडे वन्यप्रेमींनी मायाचे दर्शन होत असल्याने चिंता व्यक्त केली आहे.
तेरा वर्षांची असलेली ताडोबाची राणी माया वाघीण ताडोबा व्याघ्र प्रकल्पात अधिराज्य करीत आहे. अनेकांना तिची भुरळ आहे. काही सेलिब्रिटी तिचे फॅन आहे. खास करून तिला पाहण्यासाठी पर्यटक ताडोबात येतात. पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या मायाची पर्यटकांच्या तोंडी नेहमीच तिची चर्चा असते.
कोअर झोन पावसाळ्यात नेहमी बंद असते. तर बफर झोनमध्ये सफारी सूरु असते. नुकतीच १ ऑक्टोबर २०२३ ला कोर्झोन मधिल सफारी सुरू झाली आहे. या महिनाभराच्या काळात एकाही पर्यटकांना माया वाघीनीचे दर्शन झाले नाही. त्यामुळे पर्यटक नाराज आहेत. ती ताडोबात कुठेच दिसून न आल्याने विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. ती शेवटची २५ ऑगस्ट २०२३ ला पंचधारा लोकेशनवर काही मजुरांना दिसून आली होती, अशी माहिती आहे. ताडोबातील काही मार्गदर्शकाकडून ती गरोदर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तिने जर बछड्यांना जन्म दिला असेल तर त्यामुळे ती बाहेर येत नसावी असेही सांगितले जाते. खास मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार खास सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ती ज्या क्षेत्रामध्ये वावरत होती त्या ठिकाणी अन्य दोन वाघिणी छोटी तारा आणि रोमा यांचे वावर दिसून येत आहे. . त्यामुळे मायाने आपला क्षेत्र बदलविल्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे माया सध्या 13 वर्षांची झाली आहे. या वयात वाघाचा नैसर्गिक मृत्यू होणे स्वाभाविक असल्याने वण्यप्रेमी सांगत आहेत. ताडोबात मागिल दोन महिन्यापासून ती दिसत नसल्याने वनविभागाने ड्रोन व्दारे शोध घेतला जात असल्याची माहिती आहे. मात्र या ड्रोन मध्ये व लावलेल्या कॅमेरा ट्रॅप मध्ये ती दिसून आली नसल्याची माहिती समोर येत आहे.
1 ऑक्टोबर पासून ताडोबा व्याघ्रप्रकल्प पर्यटकांसाठी सुरु करण्यात आला. मात्र, ताडोबा व्याघ्रप्रकल्पाचं सर्वात मोठं आकर्षण समजली जाणारी माया वाघीण अजूनही पर्यटकांच्या नजरेस पडलेली नाही. त्यामुळे माया वाघिणीचा शोध काढण्यासाठी सध्या 125 च्यावर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले आहे. तसेच वाघीणीवर तिक्ष्ण नजर व शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेरा ही फिरविल्या जात आहे.मात्र माया वाघिणीचा अधिवास असलेल्या पांढरपौनी भागात सध्या खूप पाणी असल्याने आणि या वाघिणीचा जुना अनुभव बघता या भागात फूट पेट्रोलिंग शक्य नाही. माया बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रियेमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसून येत आहे. काही वनाधिकारी माया तोडोबातच आहे. तिचा शोध घेणे सुरू असल्याचे सांगत आहेत. परंतू दोन महिन्यापासून तिचे दर्शन पर्यटकांना होत नसल्याने माया वाघीण बेपत्ता बेपत्ता कि घातपात यावर चर्चा पहायला मिळत आहे. माया वाघीण ताडोबात असती तर कुठेतरी दिसली असती.
माया वाघीण ताडोबातच असती तर ड्रोन,ट्रॅप कॅमेरे किंवा पर्यटकांना निश्चितच दिसली असती.पण ती कोणाचाही नजरेस आली नाही. मायाने क्षेत्र बदलविले असेल तर दुस-या क्षेत्रात दिसली असती. तिच्या क्षेत्रात दोन वाघीणी आल्याने माया वाघीणीची घातपाताची शक्यता बळावली आहे, अशी प्रतिक्रिया चिमूर येथील वन्यजीव प्रेमी कवडू लोहकरे यांनी व्यक्त केली आहे.