Tadali MIDC Fire Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Fire | ताडाळी MIDC मध्ये कंपनीला भीषण आग; प्लास्टिक साहित्याने घेतला पेट

पाटील रेल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत आगीचे रौद्ररूप; अग्निशमन दलाकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

पुढारी वृत्तसेवा

Tadali MIDC Fire

चंद्रपूर :  चंद्रपूर शहरालगत असलेल्या तडाली औद्योगिक वसाहतीतील (MIDC) एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. पाटील रेल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत काम सुरू असताना प्लास्टिक साहित्याने अचानक पेट घेतल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. या घटनेमुळे औद्योगिक परिसरात एकच खळबळ उडाली असून, आगीचे मोठे लोळ आणि धुराचे लोट परिसरात पसरले आहेत.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच पोलीस पथकही घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

कंपनीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साहित्य असल्याने आग विझविण्यात अडथळे निर्माण होत असल्याची शक्यता आहे. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, या घटनेत किती नुकसान झाले आणि कोणतीही जीवितहानी झाली आहे का, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू असून आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतरच नुकसानीचा तपशील स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT