चंद्रपूर : शेतातील वाटाण्याच्या शेंगा तोडल्याच्या कारणावरून 65 वर्षीय जन्मदात्याची बत्तीस वर्षीय मुलाने बेदम मारहाण करून निर्दयपणे हत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.११) ब्रह्मपुरी तालुक्यातील बरडकिन्ही या गावी घडली. नामदेव लक्ष्मण गडे (वय ६५) असे मृतकाचे नाव आहे. तर होमराज नामदेव गडे (वय ३२) असे आरोपी मुलाचे नाव आहे. खून करण्यासाठी वापरलेले काठी तसेच रक्ताने भरलेले कपडे हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो निष्फळ ठरला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल मंगळवारी वडील नामदेव लक्ष्मण गडे हे त्यांचे नातेवाईक नीलकंठ परसराम वाकडे यांच्या शेतात वाटाण्याच्या शेंगा तोडण्याकरिता गेले होते. आरोपी मुलगा होमराज नामदेव गडे याने नातेवाईकाच्या शेतामध्ये वाटाण्याच्या शेंगा तोडण्यासाठी कशाला गेला. आणि शेतामध्ये वडीलाला मारहाण केली. त्यावेळी वडील मुलाच्या मारहाणीतून कसे बस निसटून घरी पळून आले. त्यानंतर पुन्हा रात्री दहा वाजताच्या सुमारास मुलाने वडिलास नीलकंठ पाकडे यांच्या शेतामध्ये शेंगा तोडण्यासाठी कशाला गेलास म्हणून भांडण सुरू केले. त्यानंतर वडिलाला काठीने डोक्यावर, पायांवर, चेहऱ्यावर बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याने वडील ठार झाले.
गावचे पोलीस पाटील यांना या घटनेचा संशय आल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे माहिती दिली. पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक नितेश डोरलीकर घटनास्थळी दाखल होवून मृतक वडील नामदेव लक्ष्मण गडे याचे प्रेत ताब्यामध्ये घेतले. घटनास्थळी पंचनामा करून कारवाई नंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे पाठविण्यात आला. ब्रम्हपुरी पोलिसांनी आरोपी मुलगा होमराज नामदेव गडे यास अटक करण्यात आली आहे.