Drowning  Pudhari
चंद्रपूर

Student Drowned Chandrapur | गोसेखुर्द कालव्यात शाळकरी विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरू

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील घटना

पुढारी वृत्तसेवा

Sawali Student Drowned Gosikhurd Canal

चंद्रपूर : जिल्ह्यातील सावली येथील रमाबाई आंबेडकर विद्यालयात 10 मध्ये शिकणारा विद्यार्थी नैतिक विठ्ठल शेडमाके (वय 15) हा आपल्या दोन मित्रांसोबत गोसेखुर्द कालव्याकडे आंघोळीसाठी गेला होता. यावेळी पाण्यातून वाहून गेला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून विद्यार्थ्याचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

मात्र नैतिक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे लक्षात येताच सोबतचे दोन्ही मित्र घाबरून घरी परत आले. नैतिक घरी आलेला नाही म्हणून सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. मात्र थांगपत्ता लागला नाही.

शेवटी आज त्या दोन्ही मित्रांनी सत्य कहाणी सांगितल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली आहे. घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली. कालव्यातील पाण्याचा प्रवाह आणि परिस्थिती लक्षात घेता शोधमोहीम राबविण्यात येत असून, विद्यार्थी शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT