Chandrapur Drug Trafficking | गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक, रामनगर पोलिसांची कारवाई Pudhari Photo
चंद्रपूर

Chandrapur Drug Trafficking | गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक, रामनगर पोलिसांची कारवाई

१ लाख ४ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : गांजाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांना रामनगर पोलिसांनी अटक करत एकूण १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मुल रोड, चंद्रपूर येथे करण्यात आली.

अजित रतन रॉय (वय ३८), सत्यजित गौरंग मंडल (वय २९), दोघेही (रा. उदयनगर, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही अवैधरित्या गांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर रामनगर पोलिसांनी सापळा रचत त्यांना ताब्यात घेतले. आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख, सहा. पो. नि. देवाजी नरोटे, हनुमान उगले, पो. अं. जितेंद्र आकरे, आनंद खरात, सचिन गुरनुले, पेतराज सिडाम, प्रशांत शेंदरे, लालू यादव, शरद कुडे, मनिषा मोरे, रविकुमार ढेंगळे, संदीप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोबरे, प्रफुल्ल पुप्पलवार, शक्ती कोरवार, ब्युटी साखरे आदींनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT