चंद्रपूर : आधीच प्रदुषित असलेल्या चंद्रपुर मध्ये हिवाळ्यात प्रदूषणात पुन्हा वाढ झाली आहे. विशेषतः थर्मल पॉवर स्टेशन च्या धुळीमुळे प्रदूषनात पुन्हा वाढ झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी वरून लक्षात येते.विशेष म्हणजे सुक्ष्म धूलिकनाचे वाढलेले प्रदूषण आरोग्यासाठी धोकादायक आहे. चंद्रपूर शहरात नोव्हेबर महिन्याच्या ३० पैकी ३० दिवस प्रदूषित आढळून आले. या बाबतची माहिती पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
०-५० AQI (Good) निर्देशांक आरोग्यासाठी चांगला मानला जातो,असा येथे एकही दिवस नव्हता.
५१-१०० AQI ( Satisfactory) निर्देशांक हा सुद्धा एकही दिवस नव्हता.
१०१ -२०० AQI ( Moderate) निर्देशांक सर्वसाधारण प्रदूषित श्रेणीत येतो. असे येथे २९ दिवस आढळले
२०१-३०० AQI (Poor) निर्देशांक असून,असा केवळ एक दिवस (१९ नोव्हेंबर) आढळला.
समाधानाची बाब म्हणजे ३०१-४०० AQI(Very Poor) निर्देशांक आणि ४०१-५०० AQI (Severe)निर्देशांक हे धोकादायक प्रदूषण मानले जाते,हे प्रदूषण येथे आढळले नाही.
हवा गुणवत्ता निर्देशांक काढण्यासाठी कमीत कमी 3 तर जास्तीत जास्त 8 प्रदुषकाना प्रमाण मानले जाते. त्यात धूलिकण,2.5,10 ओझोन,कार्बन मोनोकसाईड, सल्फर डाय ओकसाईड, नायट्रोजन डाय ओकसाईड, अमोनिया, लीड ह्या प्रदूषकांना मिळून निर्देशांक काढला जातो.
वाहनांची वाढती संख्या ,त्यातून निघनारा धूर ,धूळ , रस्त्यावरील धूळ,कचरा ज्वलन ,बांधकाम, स्थानिक थर्मल पॉवर उद्योग आदी कारणांमुळे चंद्रपूर शहरात प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक शहरात अलीकडे विकासासाठी विविध बांधकाम, रस्ते बांधणे सुरू असते. त्यातच वाहनाच्या संख्येत वाढ होत आहे.त्यातून मोठ्या प्रमाणावर धूळ आणि धूर बाहेर पडते.बहुतेक शहरात सुद्धा अश्याच समस्या निर्माण होत असल्याने प्रदूषणात सतत वाढ होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी वरून लक्षात येते.
हिवाळ्यात दरवर्षी प्रदूषण वाढते.थंडी मुळे आणि संथवाऱ्यामुळे प्रदूषके वाहून न जाता एकाच ठिकाणी जमिनीवर स्थिर होतात.पूर्वी हिवाळा आरोग्यासाठी चाचांगला मानला जात असे, परंतु अलीकडे प्रदूषणामुळे तो धोकादायक ठरत आहे. प्रदूषणामुळे आधिच श्वसनाच्या रोग् असणाऱ्या ना हानिकारक असते तसेच नव्याने श्वसनाचे रोग वाढू शकतात.दमा, ब्रॉकाय टिस, टीबी,हृदय रोग आणि मानसिक रोग वाढतात.
अलीकडे औद्योगिक क्षेत्रात सर्वाधिक प्रदूषण असले तरी महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यात प्रदूषण वाढले आहे. वाढती वाहने,धुळीचे रस्ते, कचरा ज्वलन,कोळसा ज्वलन,थर्मल पॉवर स्टेशन आणि शहरातील व्यावसाईक प्रतिष्ठाण कारणीभूत असतात. हे प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी वृक्षसंख्येत वाढ करणे,शहरात सायकलचा उपयोग वाढविणे, बेटरी वर चालणारी वाहने वाढविणे, सार्वजनिक वाहने वापरने ,वाहनांच्या संख्येत घट करणे,कचरा न इळणे ,उदयोगांणी प्रदूषण रोखणे , नागरिकांनी सुद्धा प्रदूषण होऊ नये अश्या उपाययोजना करणे , स्मोग टॉवर्स, फॉग मशीन हे तात्पुरते उपाय आहेत. प्रशासनाने कडक उपाय योजना राबवून प्रदूषनावर नियंत्रण आणावे अशी मागणी पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी केली आहे.