file photo
चंद्रपूर

अट्टल गुन्हेगाराला चंद्रपूर पोलिसांनी केले गजाआड

आरोपीला अवघ्या दोन तासांत अटक

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : काल शहरातील दोन सराफी दुकानातून सोन्याच्या ऐवज लांबविणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी अवघ्या दोन तासांत गजाआड केले आहे. हमजा अब्दुल वहीद शेख (वय ३०,रा.अरविंद नगर) चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे.

काल बुधवारी चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन हद्दीत दोन सराफ दुकानात दुकानदाराची फसवणूक करणाऱ्या व त्यांना चकमा देवून सोन्याची आंगठी चोरुन त्याऐवजी नकली आंगठी ठेवून पसार झालेले चोरटे सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळून आले. सदर रेकॉर्ड वरून आरोपीला अवघ्या दोन तासांत चंद्रपूर शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन्ही सराफ दुकानातील चोरीस गेलेली ६५ हजार रुपयाची सोन्याची आंगठी हस्तगत करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT