Chandrapur police officers honored Pudhari
चंद्रपूर

Maharashtra Police DGP Medal | चंद्रपूर पोलीस दलाचा बहुमान: ४ अधिकारी, अंमलदारांना 'पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह' जाहीर

महाराष्ट्र पोलीस दलात बजावलेल्या अत्यंत उत्कृष्ट, उल्लेखनीय सेवेबद्दल प्रतिष्ठेचा 'पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह' पुरस्काराने गौरव

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur police officers honored

चंद्रपूर : महाराष्ट्र पोलीस दलात बजावलेल्या अत्यंत उत्कृष्ट, उल्लेखनीय सेवेबद्दल दिला जाणारा सन २०२६ चा मानाचा आणि प्रतिष्ठेचा 'पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह' (DG Insignia) पदक चंद्रपूर पोलीस दलातील चार कर्तव्यदक्ष अधिकारी व अंमलदारांना जाहीर झाला आहे. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे चंद्रपूर पोलीस दलाची मान संपूर्ण राज्यात अभिमानाने उंचावली आहे.

पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांमध्ये शिवाजी भिमराव कदम (पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन गडचांदूर), सुनील माधवराव गौरकार (पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर), विलास झिटुजी निकोडे (पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर), संदिप कृष्णाजी उपरे (पोलीस हवालदार, पोलीस मुख्यालय, चंद्रपूर) यांचा समावेश आहे.

सदर पुरस्कार हे संबंधित अधिकारी व अंमलदारांनी त्यांच्या कार्यकाळात दाखवलेले अतुलनीय साहस, कर्तव्यपरायणता आणि गुन्हे तपासातील नैपुण्य याची दखल घेऊन जाहीर करण्यात आले आहेत. त्यांच्या या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल चंद्रपूर पोलीस दलाच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे शुक्रवारी (दि. 1) त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे हस्ते 'गौरव सन्मानपत्र'  देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT