चंद्रपूर

चंद्रपूर : ओबीसी आंदोलक अजित सुकारे यांनी सरकारला दिला चार दिवसाचा अल्टिमेट

backup backup

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : ओबीसी समाजाच्या न्यायीक मागण्यासाठी सात दिवसांपासून चिमुरात सुरू असलेल्या आंदोलनाकडे सत्ताधारी आणि विरोधकांनी दुर्लक्ष केल्याने आंदोलक अजित सुकारे यांनी सरकारला चार दिवसाचा अल्टिमेट दिला आहे. सद्या त्यांचे क्रांतीभूमीत सात दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. प्रकृती बिघडली तर वैद्यकीय उपचार घेणार नाही असा इशारा दिला आहे.

7 डिसेंबर पासुन चिमुर क्रांती भुमीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते अजित सुकारे व अक्षय लाजेवार, या दोन ओबीसी कार्यकर्त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. काल अक्षय लांजेवार यांची  प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सात दिवसांपासून  लोकप्रतिनिधीकडुन व सरकारकडून ओबीसीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे सरकार व लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात आक्रोश तयार झाला आहे.

चंद्रपूर येथे झालेल्या अन्नत्याग आंदोलनास राज्य सरकारने आश्वासनाची पाने पुसल्याने ओबीसी क्रांतीचा दुसरा टप्पा म्हणून चिमुर क्रांती भुमीत अन्नत्याग आंदोलन सुरू केले.या आंदोलन प्रसंगी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी थाळी वाजवा, भिक मांगो, रास्ता रोको आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. परंतु  विरोधी पक्ष व सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे  राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते अजित सुकारे यांनी सरकारला चार दिवसाचा अल्टिमेट दिला आहे. यावर बोलताना सुकारे यांनी सांगितले की, सात दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. लोकप्रतिनिधी व सरकारने ओबीसीच्या मागण्यांची दखल घेतली नाही. विरोधीपक्षातील लोकप्रतिनिधी यांनी अधिवेशनात सुद्धा मुद्दा उपस्थित केला चार दिवसात ओबीसी मागण्या संदर्भात सरकारने तातडीने पाऊले उचलली नाही तर वैद्यकीय उपचार घेणार नाही, असा इशारा दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी, झाड झडूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बाम बनेगे, नाव लगेगे किनारे, या भजनाने भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी चिमूर क्रांती भूमी पेटून उठली. त्याप्रमाणेच ओबीसी प्रवर्गाच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा चिमूर क्रांती भूमी पेटून उठेल असा इशारा दिला.

SCROLL FOR NEXT