Chandrapur News | मोटारसायकल चोरणारे तीन सराईत चोरटे अटकेत  
चंद्रपूर

Chandrapur Crime| मोटारसायकल चोरणारे तीन सराईत चोरटे अटकेत

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरची कारवाई : १ लाख रुपये किंमतीची मोटारसायकल जप्त

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने कारवाई करत तिघा सराईत चोरट्यांना चोरीच्या मोटारसायकलीसह अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून १ लाख रुपये किंमतीची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (क्र. एम.एच.३४-सीजी-९९३१) जप्त करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, तीन युवक सामान्य रुग्णालय, चंद्रपूर परिसरात संशयास्पद स्थितीत फिरत आहेत. पथकाने तत्काळ कारवाई करत पंचासमक्ष त्यांची चौकशी केली असता, हे तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत चोरटे असल्याचे निष्पन्न झाले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये योगेश चक्रधर सहारे (वय १९)  रा. येरगाव, सिंदेवाह, अभय अनिल बोरकर (वय २३)  रा. लोणवाही, सिंदेवाही, ३) साहिल संदीप बोरकर (वय १९) रा. लोणवाही सिंदेवाही यांचा समावेश आहे.

त्यांच्या ताब्यातील होंडा युनिकॉर्न मोटारसायकल ही पोलीस स्टेशन सिंदेवाही येथील गुन्हा क्र. २१९/२०२५, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता-२०२३ मधील चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तिन्ही आरोपींना मोटारसायकलीसह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी सिंदेवाही पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

  ही कारवाई पोलीस अधीक्षक  मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात सपोनि दिपक कॉक्रेडवार, पोउपनि  संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोहवा नितीन साळवे, नितीन कुरेकार, प्रमोद कोटनाके, गजानन मडावी तसेच पोअं. अमोल सावे व प्रसाद धुळगंडे यांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT