चंद्रपूर : नवजातबाळाला रस्त्यावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना वरोरा येथे उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नवजात बाळाला ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्याची प्रकृती ठीक आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.
नवजात बालकाला सोडून दिल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. सदर घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतली. नवजात बाळाला ताब्यात घेऊन तात्काळ उपचारासाठी वरोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बालकाची प्रकृती आणि पुढील उपचार लक्षात घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात आली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. बालकाच्या जन्मासंबंधी तसेच त्याला सोडून देण्याच्या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित मातेचा शोध घेण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा येथील तपास अधिकारी एपीआय गणेश झांबरे करीत आहेत