Mother Son Accident Nagbhid Chandrapur
चंद्रपूर : नागभीड शहरातील तहसील कार्यालय रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात होऊन मुलाचा मृत्यू तर आई गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. ६) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मृतकाचे नाव अमोल हरिदास जीवतोडे (वय ३४, रा. नागभीड) असे आहे.
नागभीड येथील तहसील कार्यालय रोडवर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट वीज खांबाला धडकल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे.मृतकाचे नाव अमोल हरिदास जीवतोडे (वय ३४,) रा. नागभीड) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल जीवतोडे हा आपल्या आई हिरकन्या हरिदास जीवतोडे (वय ५४) यांच्यासह दुचाकीने शिवनगर येथे घरी जात होता.
दरम्यान तहसील कार्यालय रस्त्यावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट वीज खांबाला धडकले. या धडकेत अमोल जीवतोडे याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची आई हिरकन्या जीवतोडे गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.