चंद्रपूर जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा File Photo
चंद्रपूर

Mayor Reservation Chandrapur | चंद्रपूर महापालिकेच्या महापौरपदासाठी ओबीसी महिला आरक्षण

Chandrapur Politics | आरक्षण सोडतीत शिक्कामोर्तब; ओबीसी समाजातील महिलेला पुन्हा मिळणार महापौरपदाची संधी

पुढारी वृत्तसेवा

OBC Women Reservation Mayor Chandrapur

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज आरक्षणाची सोडत पार पडली. या सोडतीत महापौर पद ओबीसी महिला (इतर मागासवर्गीय महिला) या प्रवर्गासाठी आरक्षित निघाल्याने चंद्रपूर शहराला पुन्हा एकदा ओबीसी समाजातील महिला महापौर मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घोषणेमुळे महापालिकेतील सत्तासंघर्षाला नवे वळण मिळाले असून राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या नव्या कार्यकाळासाठी महापौर पदाच्या आरक्षणाची अधिकृत सोडत आज पार पडली. या सोडतीत महापौर पद ओबीसी महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे येत्या काळात चंद्रपूर महानगरपालिकेच्या सर्वोच्च पदावर ओबीसी समाजातील एका महिलेला संधी मिळणार आहे.

विशेष म्हणजे, चंद्रपूर महापालिकेत यापूर्वीही ओबीसी महिला महापौरपदावर विराजमान झाल्या असून, यंदाही त्याच प्रवर्गाला संधी मिळाल्याने महिला नेतृत्वाला बळ मिळाले आहे. ओबीसी समाजासह महिला संघटनांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

दरम्यान, महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. अशा परिस्थितीत महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे संभाव्य युती आणि सत्तासमीकरणे नव्याने आखली जाणार आहेत. विशेषतः ओबीसी महिला उमेदवार उपलब्ध असलेल्या पक्षांकडे आता लक्ष केंद्रीत झाले आहे.

महापौर पदासाठी कोणत्या पक्षाकडून कोणत्या ओबीसी महिला उमेदवाराला संधी दिली जाणार, याबाबत उत्सुकता वाढली असून, आगामी काही दिवसांत राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेच्या दृष्टीने ही आरक्षण सोडत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT