Theft Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Cable Theft | माढेळी-दिडोंरा मार्गावर 33 केव्ही वायरची चोरी

11 पोलवरील तब्बल दोन हजार मीटर वायर लंपास; दोन लाखांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

Madheli Didora 33KV Wire Theft

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील माढेळी एमएसईडीसीएल सबस्टेशन ते दिडोंरा बॅरेज येथील पंप हाउसदरम्यान सुरू असलेल्या विद्युत लाईनच्या कामाला चोरट्यांनी लक्ष्य केले. अज्ञात चोरट्यांनी 11 पोलवरील 33 केव्ही अल्युमिनियम वायर कापून लंपास केली. सुमारे दोन हजार मीटर वायर चोरीस गेली असून, तिची किंमत अंदाजे दोन लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दिडोंरा बॅरेज येथील पंप हाउससाठी विद्युत लाईन टाकण्याचे काम मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. या कामासाठी पोल उभारून त्यावर AAA 100 SQ MM कंडक्टर टाकण्यात आला होता. 5 सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत ही वायर व्यवस्थित असल्याचे आढळून आले होते. मात्र, 6 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास पाहणी केली असता सोईट चौक ते नाला परिसरातील 11 पोलवरील वायर गायब असल्याचे निदर्शनास आले.

वायर कापून नेण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर याबाबत वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. सदर विद्युत लाईनचे काम अधिरा इंटरप्रायजेस, नागपूर या कंत्राटदाराला देण्यात आले असून, राजू नायर व महेश पटेल यांच्या टीमकडून काम सुरू आहे.

याप्रकरणी पदमा राजू नायर यांनी वरोरा पोलिसांत लेखी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चोरीस गेलेल्या वायरचा शोध घेण्यासह चोरीमागील आरोपींचा शोध घेण्यासाठी वरोरा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT