चंद्रपूर

Chandrapur Lok Sabha election: काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांची सव्वा लाखाच्या आघाडीने विजयाकडे वाटचाल

मोनिका क्षीरसागर

चंद्रपूर,पुढारी वृत्तसेवा: आज मत मोजणीच्या दिवशी "संघर्ष जेवढा मोठा तेवढा विजय चांगला" अश्या आशयाचा ठेवलेला स्टेट्स प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. सव्वालाखाच्या आघाडीने प्रतिभा धानोरकर यांनी भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना मागे टाकले आहे. त्यांनंतर त्यांनी माध्यमांसमोर येत, विक्ट्रि चिन्ह दाखवून "संघर्ष जेवढा मोठा असतो तेवढाच विजय (Chandrapur Lok Sabha election) शानदार असतो' अशी प्रतिक्रीया दिली.

सव्वा लाखाच्या आघाडी घेतल्यानंतर धानोरकर माध्यमांसमोर आले. संघर्ष जेवढा मोठा राहील, तेवढाच विजय शानदार होइल असा मी स्टेट्स ठेवला होता. आणि तोच विजय आज 4 जुनला लोकसभा मतदार संघाच्या आजच्या निकालावरून दिसून येत आहे. बारा फेऱ्या पार पडल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांना सव्वा लाखाची लीड मिळाली आहे. शेवटपर्यंत दीड लाखाची लीड राहील असा विश्वास (Chandrapur Lok Sabha election)  पत्रकारांशी बोलताना त्यांनी व्यक्त केला.

हा माझा विजय नसून सर्व मतदारांचा, शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब जनतेचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. धानोरकर कुटुंबातून आम्ही जेव्हा निवडणुकीला उभे राहिलो तेव्हा मोठमोठ्या लोकांना पराभूत केले आहे. माझ्या पतीनेही एका कॅबिनेट मिनिस्टरला लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत केले होते. मी आमदार असतानाही ज्यांचा पराभव झाला तेही कॅबिनेट मिनिस्टर होते. आताही सुधीर मुनगंटीवार कॅबिनेट मंत्री होते. धानोरकर कुटुंबीय नेहमी कॅबिनेट मिनिस्टर यांनाच निवडणुकीत पराभव करतो; हा धानोरकर कुटुंबियांचा इतिहास आहे.

मागीलवेळी प्रत्येक पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढविली होती. यावेळी आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली. मागील दहा वर्षांपासून भाजपच्या सरकारला जनता कंटाळलेली होती. त्यामुळे मतदारांना परिवर्तन पाहिजे होते. परिवर्तनामुळे मतदार माझेसोबत होते. मतदारांना अपेक्षीत असलेला यश आजच्या निकालात दिसेल. इंडीया आघाडीतील घटक पक्ष, मित्र पक्ष, समाज आणि पडद्यामागून काम करणारे संघटनांनी जीव पणाला लावून माझ्यासाठी मेहनत केली. यंदा शेतकरी भाजपच्या विरोधात होता तोही माझ्या पाठीशी उभा होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT