चंद्रपुरातील मद्य परवाना प्रकरणाचा एसआयटीद्वारे तपास होणार 
चंद्रपूर

चंद्रपुरातील मद्य परवाना प्रकरणाचा एसआयटीद्वारे तपास

एसआयटी पथक ७ एप्रिलला चंद्रपुरात

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मद्य परवाने मंजूर करताना मोठ्या प्रमाणात झालेला गैरव्यवहार, अनियमितता व लाचखोरीच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संदिप दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्यात आली आहे. हे पथक तपास करण्यासाठी ७ व ८ एप्रिलला चंद्रपुरात येत आहे. सकाळी १० ते १२ या वेळेत विशेष तपास पथक (SIT) अध्यक्ष संदिप दिवाण हे आपल्या पथकासह चंद्रपूर विश्रामगृहात या प्रकरणाचा तपास करणार आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठविल्यानंतर शासन अधिसूचना ८ जून २०२१ नंतर जिल्ह्यात नुतनीकरण करून कार्यान्वीत करण्यात आलेल्या अबकारी अनुज्ञप्ती, नव्याने मंजुर करण्यात आलेल्या अबकारी अनुज्ञप्ती, नव्याने मंजुर करण्यात आलेल्या इतर जिल्ह्यातून स्थलांतरीत होवून आलेल्या अनुज्ञप्ती (प्रकारानुसार : सीएल-3, एफएल-3, एफएलबीआर-2 इ.) बाबत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व अनियमितता तसेच लाचखोरीच्या घटना समोर आल्या आहेत.

या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार या प्रकरणाच्या तपासासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संदिप दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्यात आले. ७ व ८ एप्रिलला हे पथक तपासाठी चंद्रपुरात येत आहे. प्रकरणाशी संबंधीत आक्षेपाबाबत, काही तक्रारी असतील किंवा यातील आक्षेपाच्या अनुषंगाने काही माहिती असेल, त्यांनी त्यांच्याकडील कागदपत्रांसह विशेष तपास पथकास (SIT) ला ७ व ८ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ या वेळेस चंद्रपूर विश्रामगृह येथे प्रत्यक्ष भेट शकतील. एसआयटीद्वारे मद्य परवाने मंजूर करताना झालेला गैरव्यवहार, अनियमितता व लाचखोरीच्या घटनाचा तपास सुरू घातला असून याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT