चंद्रपुरात "जय शिवाजी जय भारत" पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले Pudhari Photo
चंद्रपूर

चंद्रपुरात "जय शिवाजी जय भारत" पदयात्रेतून शिवजागर

Shiv Jayanti 2025 | पथनाट्यामधून शिवचरित्राचे उत्‍कृष्ट सादरीकरण

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन, चंद्रपूर महानगरपालिका, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चांदा क्लब ग्राउंड येथून "जय शिवाजी जय भारत" पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. यात अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जल्लोषात शिवजागर केला.

पदयात्रेच्या उदघाटनप्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., आयुक्त विपीन पालीवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, शिक्षणाधिकारी राजेश पातळे आणि अश्विनी सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाने दिलेली दूरदष्टी, सर्वसमावेशकता, महिलांचा आदर, स्वाभिमान, कल्याणकारी प्रशासन, पेचप्रसंगातून बाहेर पडण्याची निर्भयता, गडकिल्यांची गरज, आरमार, लष्करी शिक्षण, जिंकण्याचे मानसशास्त्र यासारख्या विविध गुणांद्वारे आदर्श व ऐतिहासिक वारसा महाराष्ट्रासाठी अमुल्य आहे.

यावेळी क्रीडा अधिकारी मनोज पंधराम यांनी स्वतः पेंटींग द्वारे तयार केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले. या पदयात्रेत जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटना, सामाजिक संघटना, महिला संघटना, जेष्ठ नागरिक, एन.एस.एस, एन.सी.सी., क्रीडाप्रेमी, क्रीडाशिक्षक, खेळाडू, विद्यार्थी, शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पथनाट्यामधून शिवचरीत्राचे उत्‍कृष्ट सादरीकरण करण्यात आले.

शिवप्रतिमेचे पूजन करुन जिल्हाधिकारी व मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेला सुरुवात झाली. शिवाजी महाराजांच्या जयघोषाने प्रियदर्शनी चौक, जटपूरा गेट, रामनगर, डॉ. आंबेडकर महाविद्यालय व चांदा क्लब ग्राउंड अशी भव्य पदयात्रा थाटात व प्रचंड शिवप्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झाली. विशेष म्हणजे या पदयात्रेत सहभागी विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक पात्रांच्या विविध वेशभूषा साकारल्या होत्या.

जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पूंड, गटशिक्षणाधिकारी कांबळे, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठीकरे, जयश्री देवकर, जिल्हा युवा अधिकारी, सर्व क्रीडा अधिकारी, मार्गदर्शक, सर्व शाळा, क्रीडा शिक्षक, सर्व प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी या सर्वांनी पदयात्रेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT