Chandrapur police raid illegal cockfight
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील जांर्भला गावाच्या तलावाजवळ अवैधरित्या सुरू असलेल्या कोंबडयाच्या झुंजीच्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत तीन आरोपींना अटक केली. या कारवाईत १५ कोंबडे, सात वाहने व रोख रक्कमसह तब्बल ५.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील मौजा जांर्भला गावाच्या तलावाजवळ अवैध कोंबड्यांवर जुगर सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाला मिळाली. सदर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जांर्भला जगावाच्या तलावाजवळ घटनास्थळी धाड टाकली. आरोपी नामे फारुख बहादुर शेख (वय 38) रा. चंद्रपूर, मुकेश नामदेव दशमवार (वय ४६) रा. बाबुपेठ, चंद्रपूर व राजसिंग बहादुरसिंग पटवा (वय ३५) रा. मुल ह्या तिघा आरोपींना कोंबड झुंजीवरील जुगार खेळताना अटक करण्यात आली. घटनास्थळी १५ कोंबडे (त्यापैकी तीन मृत व इतर धारदार कात्यांनी जखमी), सहा मोटारसायकली व १५,५०० रुपये रोख रक्कम मिळून एकूण ५.८८ लाखांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
चौकशीत आरोपींनी कोंबड बाजार हा विशाल गावंडे (रा. अजयपूर) चालवित असल्याचे सांगितले. त्यानुसार आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) सह भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ४९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि विनोद भुरले, सर्वेश बेलसरे, पोहवा सुभाष गोहोकर, चेतन गजल्लवार, इमरान खान, सतीश अवथरे, पोलीस अंंमलदार किशोर वाकाटे, सुमित बरडे, हिरालाल गुप्ता, प्रफुल्ल गारघाटे व शशांक बादामवार यांनी यांनी केली.