Chandrapur Lohara hotel raid
चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाणे रामनगर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लकी नावाचा व्यक्ती हॉटेल ताडोबा अतिथी इन, लोहारा येथे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय चालवित असल्याचे आढळले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे रामनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. ३१) करण्यात आली.
पथकाने हॉटेलवर छापा टाकला असता लकी उर्फ लक्ष्मण रामसिंह शर्मा (वय २६) रा. अलवर, राजस्थान हा हॉटेलमध्ये एका पीडित महिलेकडून स्वतःच्या फायद्यासाठी अनैतिक मानवी व्यापार करून उपजीविका करत असल्याचे आढळले.
या कारवाईतून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून तिला पुढील काळजी व पुनर्वसनासाठी NGO च्या माध्यमातून सुरक्षित ठेवण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
कारवाईचे नेतृत्व विशेष पोलीस अधिकारी अमोल काचोरे (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर) यांनी केले. त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकर, स.फो. धनराज कारकाडे, पो. हवा. सुरेंद्र महतो, दीपक डोंगरे, पोअ. प्रफुल गारघटे, सुमित बरडे, शशांक बादमवार, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, चालक मिलिंद टेकाम तसेच महिला पोलीस छाया निकोडे, अपर्णा मानकर, उषा लेडांगे, निराशा तीतरे यांनी सहभाग घेतला.
या घटनेच्या अनुषंगाने सर्व लॉजिंग व हॉटेल व्यावसायिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अशा प्रकारे अवैध कुंटणखाने चालवू नयेत; अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.