प्रेमाचे नाटक करुन ‘ती’ तरुणी ओढते तरुणांना जाळयात  Pudhari Photo
चंद्रपूर

Chandrapur Honey Trap | ‘पैसे दे नाहीतर पोलिसांना फोन करते’ : प्रेमाचे नाटक करुन ‘ती’ तरुणी ओढते तरुणांना जाळ्यात

चिमूरमध्ये धक्कादायक प्रकरण! दोन वर्षांत डझनभर तरुण पडले भूलथापांना बळी, अखेर तरुणांची पोलिसात धाव

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : चिमूर शहरात एक धक्कादायक प्रकरण समोर आला आहे. एक अल्पवयीन मुलगी तरूणांशी फोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळीकता निर्माण करते. आणि फसव्या प्रेमाच्या जाळ्यात ओढते. तरुणांची तिच्याशी जवळीकता निर्माण झाली की, ती दुकानातून विविध वस्तू खरेदी करते. आणि वस्तूंचे बिल त्या तरुणांना देण्यासाठी दबाव टाकते. वास्तूचे पैसे दिले नाही तर खोटेनाटे आरोप लावून पोलिसात तक्रार दाखल करण्याची धमकी देते.

मागील दोन वर्षापासून हा प्रकार चिमूर शहरात सुरू असून तब्बल डझनभर तरुण या खोट्या फसव्या प्रकाराला बळी पडले आहेत. अखेर काही तरुणांनी पोलिस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम यांची भेट घेऊन त्या तरुणीविषयी माहिती दिली. त्यामुळे या प्रकाराची बिंग फुटले आहे. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिचे समुपदेशन करून तिला सध्या सोडून दिले आहे. मात्र या प्रकारावर पोलिसांची करडी नजर आहे. ज्या तरुणांची फसवणूक झाली असेल त्यांना पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी चिमूर पोलिस ठाण्यात एका तरुणाने स्वतःची चिमूरातील त्या तरुणी कडून झालेली फसवणुकी बाबत एक तक्रार दाखल केली. त्या तक्रारीनुसार, चिमूर येथील एका प्रतिष्ठित शाळेत शिकणारी १५ वर्षीय विद्यार्थिनी गेल्या दोन वर्षांपासून विविध तरुणांना फोन तसेच विविध सोशल मीडिया वरून जवळीकता निर्माण करीत आहे. त्यानंतर ती वारंवार संपर्क करते. त्यांच्या सोबत गोड गोड बोलून खोट्यानाट्य फसव्या प्रेमाच्या आणाभाका घेते. तरुण या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवून फसतात.मागील दोन वर्षांत तब्बल डझनभर तरुणांची फसवणूक झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ते एवढ्यावरच थांबले नाहीतर त्यांची फसवणूक तरुणी कशी करते त्याचा पाढाच वाचला आहे. फोन किंवा सोशल मिडिया वरून संपर्कात आल्यानंतर ती तरुणी पैशाची मागणी करते. परंतु थेट पैसे घेत नाही. त्या करिता तिने नामी शक्कल लढविली आहे. तरुणी दुकानातून स्वतःला लागणाऱ्या विविध वस्तू कपडे विकत घेते. त्यानंतर त्या वस्तूंचे बिल देण्यासाठी फसवणुकीत बळी ठरलेल्या तरुणाला फोन करते. पैशाची मागणी करते. परंतु उपाशी स्वतःचे बँक किंवा अन्य खात्यावर घेत नाही.. दुकानातून कपडे घेतल्यास दुकानदाराला एवढी पैसे टाकण्याचे फरमान सोडते. जर त्या तरुणाने पैसे टाकण्यास नकार दिला तर छेडखानी केल्याची व विविध आरोप करून पोलिसात तक्रार करण्याची धमकी देते.

हिम्मत दाखवून पोलिसांत तक्रार
डझनभर तरुण या प्रकाराला बळी पडल्यानंतर हा प्रकार वाढतच असताना काही तरुणांनी हिम्मत दाखवून सदर तरुणी विषयी चिमूर पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकाराची माहिती दिली. अत्यंत गंभीर असलेल्या या प्रकारामुळे पोलिसांनी लगेच दखल घेतली आणि त्या तरुणीला पोलीस ठाण्यात बोलवून याबाबत विचारपूस केली. सदर तरुणीने पोलिसांना कबुली जबाब देताना सांगितले आहे की, तरुणांकडून लाटलेल्या रकमेवर कपडे, सौंदर्यप्रसाधने आणि घरगुती वस्तू खरेदी केल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे तरुण घाबरतात आणि तिच्या आमिषाला बळी पडतात आणि तेवढे पैसे त्यांना द्यावे लागते. डझनभर तरुणांनी मागील दोन वर्षात हजारो रुपयाची रक्कम तिच्यावर उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे चिमूर पोलीस अशा ठाण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून दीप्ती मरकाम या रुजू झाल्‍या आहेत. एक महिला असल्यामुळे महिलांचे प्रश्न त्या पोट तिडकीने समजून घेतात. महिला व अन्याय झाल्यास त्या क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी पुढे येतात. सदर तरुणी त्या महिला पोलीस उपनिरीक्षकांकडे तक्रार दाखल करण्याची धमकी देतात असेही तक्रारीत सांगण्यात आले आहे.

काही दुकानदाराकडे स्कॅनर पाठवून आलेल्या रकमेतून रोख रक्कमही तिने घेतल्याची माहिती समोर येत आहे. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, विद्यार्थिनीने आणखी कोणी पीडित केले आहे का याचा शोध पोलिस घेत आहेत. डिजिटल व्यवहारांचे पुरावे व मोबाईल रेकॉर्ड तपासले जात आहेत.

“ब्लॅकमेलिंग झाल्यास तात्काळ तक्रार द्या”

या घटनेनंतर पीएसआय दीप्ती मरकाम यांनी आवाहन केले आहे की, “जर कोणी पोलिसांचे नाव घेऊन धमकावत असेल किंवा पैशांची मागणी करत असेल, तर तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा. कोणत्याही परिस्थितीत ब्लॅकमेलिंगला बळी पडू नका. तक्रार नोंदवण्यासाठी – नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी चिमूर पोलिसांशी संपर्क साधावा

पालक व शिक्षकांना बोलावून समुपदेशन

तक्रार नोंदवल्यानंतर पोलीसांनी अल्पवयीन मुलीची आई, पालक व शाळेतील शिक्षकांना पोलिस ठाण्यात बोलावून समुपदेशन केले. सध्या मुलीला तिच्या आईच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती ठाणेदार दिनेश लबडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT