अल्पेश दहागावकर Pudhari
चंद्रपूर

Chandrapur News | मित्राच्या लग्नात डिजेच्या तालावर नाचताना तरुणाचा मृत्यू

गोंडपीपरी तालुक्यातील फुर्डीहेटी येथील लग्नाच्या आनंदोत्सवात शोककळा

पुढारी वृत्तसेवा

Youth Death while dancing Chandrapur

चंद्रपूर : मित्राच्या लग्नात डिजेच्या तालावर नाचताना एका तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील फुर्डीहेटी गावात घडली. अल्पेश दहागावकर (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो फुर्डीहेटी गावातील रहिवासी होता.

अल्पेश दहागावकर आपल्या मित्राच्या लग्नाच्या कार्यक्रमात सायंकाळी डिजेच्या तालावर नाचत असताना अचानक खाली कोसळला. सुरुवातीला उपस्थितांना हा प्रकार लक्षात आला नाही, परंतु काही वेळातच तो प्रतिसाद देत नसल्याचे दिसून आले. घटनेनंतर तत्काळ उपस्थितांनी त्यांना गोंडपिपरी येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले.

मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. डीजे च्या कर्कश आवाजामुळे मृत्यू झाला असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

या घटनेमुळे लग्न समारंभात एकच खळबळ उडाली असून, आनंदाचे वातावरण क्षणात शोकमय झाले. अल्पेश दहागावकर यांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT