चंद्रपुरात वन विकास महामंडळाच्या जंगलाला भीषण आग लागली आहे. Pudhari Photo
चंद्रपूर

चंद्रपुरात वन विकास महामंडळाच्या जंगलाला भीषण आग

Chandrapur Jungel Fire | आगीत मौल्यवान वनस्पती नष्ट होण्याचा धोका

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर मुल मार्गालगतच्या चंद्रपूर वन विकास महामंडळाच्या जंगलाला भीषण लागल्याची घटना आज रविवारी साडेतीनच्या सुमारास समोर आली आहे. आगीने रौद्ररूप धारण केला असून आग आटोक्यात आणण्यासाठी वन विकास महामंडळाचे यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करीत आहे. या गीत जंगलातील मौल्यवान वनस्पती नष्ट होण्याचा धोका आहे वर्तविण्यात येत आहे.

चंद्रपूर हा उष्ण जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे मार्च महिन्यापासूनच तापमान चढायला लागते. सध्या स्थितीत चाळीसीच्या आसपास तापमान आहे. याचवेळी दरवर्षीच आगीच्या घटना समोर येतात. आज 16 मार्च रोजी दुपारी चंद्रपूर वनविकास महामंडळाच्या जंगलात लोहारा ते घंटाचौकी भागत भीषण आग लागली आहे. चंद्रपूर ते मूल महामार्ग लगत हा भाग येतो. आगीत खूप मोठ्या प्रमाणात जंगल जळत असून आगीने रौद्ररूप धारण केले आहे. आग लागल्याची माहिती समोर आल्यानंतर वनविभागास महामंडळाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही. कडक ऊन असल्यामुळे रस्त्याच्या कडेने आगीच्या ज्‍वाळा धडकत आहे. ज्या भागामध्ये आग लागली आहे त्याच परिसरात सागाचे घनदाट जंगल आहे. तसेच पानगळ झाल्यामुळे जंगलात पालाचोळा जंगलात पडला असल्यामुळे आग भडकत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT