Chandrapur firing News
राजुरा शहरात गोळीबार झाला. 
चंद्रपूर

चंद्रपूर : राजुरा शहरात गोळीबार; ट्रक चालक ठार

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर :  राजुरा शहरातील गजबजलेल्या आसिफाबाद मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज संकुलासमोर एका तरूणावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. यामध्ये शिवजीतसिंग देवल (वय २८) हा तरूण ठार झाला. हा तरूण ट्रकचालक असून मंगळवारी (दि.२३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवजीतसिंग देवल याच्या मागावर दोन अज्ञात हल्लेखोर होते. राजुरा शहरातील गजबजलेल्या आसिफाबाद मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज संकुलासमोर शिवजीतसिंग देवल आला असता मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर पहिली गोळी झाडली. त्यानंतर हा युवक तेथील ओम जनरल स्टोअर्स  मधून पळून मागे मोकळ्या जागेत गेला. मात्र दोन्ही हल्लेखोरानी त्याचा पाठलाग जवळून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात शिवजीतसिंग देवलचा जागीच मृत्यू झाला. शिवजीतसिंग देवल हा मागील वर्षी झालेल्या गोळीबारातील आरोपीचा मोठा भाऊ असल्याचे समजते. मागील वर्षी याच तारखेला गोळीबार करून एका महिलेचा हकनाक बळी गेला होता. माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृत्तदेह ताब्यात घेवून राजुरा उपजिल्हा रूग्णालयात हलविले. घटना घडताच पोलिस बंदोबस्त चोख करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

SCROLL FOR NEXT