Chandrapur water for paddy fields
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील ऐतिहासिक घोडाझरी प्रकल्पात यावर्षी 80 ते 90 टक्के जलसाठा उपलब्ध असूनही उन्हाळी धानपिकासाठी पाणीपुरवठ्याचा निर्णय प्रलंबित आहे. सतत झालेल्या पावसामुळे खरिपातील धान पिकाचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता उन्हाळी हंगामच आशेचा किरण वाटत आहे. त्यामुळे घोडा जरी सिंचन विभागाने उन्हाळी धान पिकासाठी पाणी सोडावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
घोडाझरी तलाव – शेतकऱ्यांची जीवनदायिनी
ब्रिटिश कालीन घोडाझरी तलाव नागभीड तसेच नवरगाव, सिंदेवाही परिसरातील हजारो एकर शेतीला आधार देतो. या सिंचनावर धान पिकांची लागवड केली जाते. त्यावर उत्पादन घेतले जाते आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. त्यामुळे प्रकल्पावर हजारो एकर मधील शेती अवलंबून आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील शेतकरी उन्हाळी धानपिकाची तयारी करत आहेत. सिंचन विभागाकडून पाणी सोडल्यास यावेळी शेतकरी त्यांनी बघितलेले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
पावसाने खरिपातील धान पिकाची परिस्थिती बिकट
सलग आणि अतिवृष्टीमुळे यंदाचा खरिप हंगाम अक्षरशः उद्ध्वस्त झाला. शेतकऱ्यांची पिके वाहून गेली, सडले त्यामुळे उताऱ्यात मोठी तफावत आली आहे. खर्चापेक्षा अर्धाही उत्पन्न हातात आलेला नाही. उत्पन्नात घट येऊ लागल्यामुळे आर्थिक घडी कोलमडली आहे. नुकसानीची भरपाई उन्हाळी धानपिकातून करणे हीच शेतकऱ्यांची एकमेव आशा आहे.
यावर्षी घोडाझरी तलावात मुबलक पाणी साठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी आशा आहे उन्हाळी लागवड करण्याची आणि त्यातून भरघोस उत्पादन घेण्याची. पावसाळ्यापेक्षा उन्हाळी दान पीक लागवडीमध्ये शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न होण्याची आशा असते रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे उत्पादन अधिक होण्याची शक्यता असते. त्यामुळेच येणोली माल येथील माजी सरपंच अमोल बावनकर यांनी या संदर्भात पुढाकार घेत शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला आहे. त्यांनी, उन्हाळी धानपिक लागवड यासाठी घोडा जरी तलावा चे पाणी सोडण्याची मागणी रेटून धरली आहे.
तलावात पुरेसे पाणी आहे. सिंचन विभागाने कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडले पाहिजे. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा हा प्रश्न आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या मागणीला परिसरातील शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून संपूर्ण क्षेत्रात ऐक्य दिसत आहे.
येणोली माल मायनरपर्यंत पाणी सोडणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाणी सोडल्यास या पट्ट्यातील सर्व गावांमध्ये उन्हाळी धानपिकाची लागवड शक्य होईल आणि शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई उन्हाळी हंगामात मिळवता येईल. हा मार्ग पाणी मिळाल्यास हजारो शेतकऱ्यांना नवजीवन देऊ शकतो असे बावनकर यांचे म्हणणे आहे.
सिंचन विभागाने उन्हाळी दानपिका करता पाणी सोडण्याकरता अद्यापही बैठक घेतली नसली तरी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करता पाणी सोडले जाईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. उन्हाळी हंगामा करिता पाणी सोडले जाईल का? शेतकऱ्यांना उन्हाळी धानपिकाची संधी मिळेल का? की भरलेल्या तलावासमोरच शेतकरी तहानलेले राहणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.