जप्त करण्यात आलेल्या अवैध देशी-विदेशी दारूसह आरोपी. pudhari photo
चंद्रपूर

चंद्रपूरात वर्षभरात सव्वा कोटींची बनावट दारू तस्करी

liquor smuggling: 22 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

पुढारी वृत्तसेवा

fake liquor smuggling Chandrapur

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयातून अवैध देशी-विदेशी दारू वाहतुक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामध्ये बनावट देशी दारूचे अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यामध्ये आता पर्यंत सव्वा कोटींची देशी दारू बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. 22 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या कारवाई नंतरही बनावट देशीची प्रकरणे थांबण्याऐवजी उघडकीस येत आहेत.

1 मे रोजी चिमुर तालुक्यातील शिवापूर बंद परिसरात दारूची तस्करी करताना स्थानिक गुन्हे शाखने साडेतीन लाखांची दारू पकडली. त्यामध्ये 90 एमएलच्या 350 पेट्यांचाही समावेश होता. या पेट्यांचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाहणी अहवाल दिला असता त्यामध्ये 350 पेट्या दारू ही बनावट असल्याचे उघड झाले.

11 नोव्हेंबर 2024 मध्ये कोरपना पोलिस स्टेशनच्या ह‌द्दीत आयशर ट्रक एम एच 40 ए के 1141 मध्ये 90 एमएल च्या ४७५ पेट्या असा एकुण ३२ लाख ७ हजार ५०० रुपयाचा मु‌द्देमाल जप्त करण्यात आला. १० मार्च २०२५ रोजी पोस्टे गोंडपिपरी हद्‌दीत आयशर ट्रक एम एच 04 एच वाय 0528 मध्ये 90 एमएल च्या ३०० पेट्या एकुण किंमत ३० लाख ६० हजार रुपयाचा मु‌द्देमाल जप्त करण्यात आला.

आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध अवैध देशी-विदेशी दारु तसेच बनावट दारु संबंधात वेगवेगळ्या ठिकाणी वेळोवेळी एकुण २२ गुन्हयाची नोंद करण्यात आली असुन त्यात आजपर्यंत एकुण २९ आरोपी अटक करण्यात आले तर एकुण १, २८,६८,४६५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये बनावट दारुची मालमत्ता १ कोटी ९ लाख ६१ हजार ३०० रूपये आहे.

वरील घटनांवरून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट देशी दारू तयार करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. येथून ही दारू गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये तस्करी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. बनावट देशी दारू मुळे नागरिकांचे आरोगय धोक्यात असले असताना पोललिसांना बनावट दारू बनविणाऱ्यांचे पाळेमुळे खणून काढण्याचे मोठे आव्हान आहे.

जिल्ह्यातील सिमेवरुन गडचिरोली व इतरत्र दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात अवैध रित्या देशी-विदेशी व बनावट देशी दारुची वाहतुक होत असल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपूर येथील टोल फ्री क्रमांक ११२ वर कॉल करुन माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT