चंद्रपूर

चंद्रपूर : ब्रिटीशकालीन ‘सराय’ धर्मशाळा इमारतीचे संवर्धन करण्यास इको-प्रोचे आंदोलन

backup backup

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा :  ऐतिहासिक 'सराई' इमारतीच्या संवर्धनाच्या मागणी करिता इको-प्रोच्या वतीने हिवाळी अधिवेशनानिमित्त सुरू असलेल्या एक दिवस एक आंदोलन शृंखले अंतर्गत आज (दि. १४) चंद्रपूर शहरात सहाव्या दिवशी सहावे आंदोलन 'सराय' बचाव सत्याग्रह करण्यात आले.

चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक 'सराई' इमारतीच्या संवर्धनाच्या मागणी करिता इको-प्रो संस्थेसह शहरातील अनेक संस्था व इतिहास अभ्यासक यांनी वेळोवेळी मागणी केली आहे. येथे इको-प्रो कडून स्वच्छता अभियान सुद्धा राबविण्यात आलेले होते. 'जागतिक वारसा दिन' १८ एप्रिल २०१८ पासून 'सराई स्वच्छता सराय इमार अभियानाची' सुरूवात करून सलग १५ दिवस या संपुर्ण इमारतीची स्वच्छता इको-प्रोच्या सदस्यांनी केली होती. या स्वच्छता सत्याग्रह माध्यमाने चंद्रपूर शहर महानगरपालिका व शासनाकडे मागणी करण्यात आली होती. याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ऐतिहासिक 'सराई' इमारतीच्या संवर्धनाच्या मागणी करिता इको-प्रोच्या वतीने इको-प्रो तर्फे बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात आज "सराय बचाव सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी धर्मेंद्र लुनावत, ओमजी वर्मा, कुणाल देवगिरकर, राजू काहिलकर, सचिन धोतरे, सुरज कावळे, आकाश घोडमारे, चंदू ओशाखा, सचिन धोतरे, प्रकाश निर्वाण, भूषण ढवळे, रोहित तळवेकर, भारती शिंदे, हर्षाली खारकर, महिमा मोहूर्ले आदी सहभागी होते.

या ऐतिहासिक इमारतीचे संरक्षण व संवर्धनासाठी पालिकेने पुढाकार घेउन या ऐतिहासिक ब्रिटीशकालिन वास्तुच्या इमारती मध्ये चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे 'ऐतिहासिक चंद्रपूर शहर पर्यटन माहीती केंद्र' तयार करण्याची मागणी करण्यात येत आहे. शहरातील या ऐतिहासिक इमारतीच्या ठिकाणी असे माहीती केंद्र तयार झाल्यास चंद्रपूरात येणाछया पर्यटकांना, नागरीकांना, विदयार्थ्यांना एकाच ठिकाणी शहरातील सर्वच ऐतिहासिक वास्तु, त्यांचे अंतर, इतिहास, कसे जावे याबाबत सविस्तर माहीती मिळु शकते. यामुळे शहरातील पर्यटन विकासाच चालना मिळेल. यासोबतच यामुळे या इमारतीचे सवर्धन सुध्दा शक्य आहे.

सरायचा इतिहास

सराय इमारतीचे बांधकाम १८२१ ते १८२७ या दरम्यान पुरातन इमारतीचे भुमीपुजन २ ऑक्टो २०१८ रोजी संपन्न झाले होते. स्वांतत्रपुर्व काळात स्वातंत्र्य लढयातील अनेक पुढारी येते थांबलेले आहेत. स्वांतत्रंलढयाच्या अनेक घटनांचे साक्षिदार असलेली ही इमारत आज नष्ट होण्याच्या स्थितीत आहे.

या सत्याग्रह मागणी नुसार सराय वास्तूचे संवर्धन, दुरुस्तीचे काम, परिसर विकास करून घाण, दुर्गंधी दूर करणे, सदर इमारत चंद्रपूर पर्यटन माहिती केंद्र तयार करणे या आहेत, याबाबत सकारात्मक निर्णय न घेण्यात आल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT