Chandrapur Crime | वरोरा पोलिसांची मोठी कारवाई : १३ चोरीच्या मोटारसायकलींसह तिघांना अटक 
चंद्रपूर

Chandrapur Crime | वरोरा पोलिसांची मोठी कारवाई : १३ चोरीच्या मोटारसायकलींसह तिघांना अटक

६.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : वरोरा शहरात सातत्याने घडणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या घटनांचा छडा लावत वरोरा पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीच्या एकूण १३ मोटारसायकली व बनावट आर.सी.सह एकूण ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

४ जुलै २०२६ रोजी वेण्णा नगर येथील अमोल दयाराम भोयर यांच्या ४० हजार रुपये किमतीच्या मोटारसायकल चोरीप्रकरणी वरोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी शहरातील तसेच नागपूर–चंद्रपूर महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. गुप्त माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता मोटारसायकल चोरीचे रॅकेट उघडकीस आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हेमंत विनोद चौधरी (रा. शिंगणापूर गोटमाडी, ता. समुद्रपूर, जि. वर्धा), सूरज एकनाथ उमरे (रा. देहेगाव, ता. वरोरा) आणि प्रमोद रामकृष्ण हेपट (रा. खांबजी वॉर्ड, वरोरा) यांचा समावेश आहे.

आरोपींकडून १३ मोटारसायकली, बनावट आर.सी. असा एकूण ६.४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या नेतृत्वात तपास पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT