Ganja Seizure Chandrapur 
चंद्रपूर

Ganja Seizure Chandrapur : ओडिशातून गांजा घेऊन येणाऱ्या तिघांना अटक

१७.४७५ किलो गांजा, चारचाकी व चार मोबाईलसह १७.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : ओडिशातून विक्रीसाठी गांजा घेऊन चारचाकी वाहनाने चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. आरोपींकडून १७.४७५ किलो गांजा, चारचाकी वाहन आणि चार मोबाईल असा एकूण १७ लाख ८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई २ सप्टेंबर रोजी बल्लारपूर-राजुरा मार्गावरील बामणी चौकात करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही इसम ओडिशातून गांजा घेऊन चारचाकी वाहनाने येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बामणी चौक परिसरात सापळा रचला. संशयित चारचाकी वाहन क्रमांक एमएच-२४ बीआर-९२८२ अडवून तपासणी केली असता त्यामध्ये गांजा सदृश्य वनस्पती आढळून आली.

पोलिसांनी अमोल रमेश कांबळे (३३, रा. एरंडी सरोडा, ता. औसा, जि. लातूर), सदानंद रविंद्र जना (३२, रा. साबोरीया, ता. खलीगोट, जि. गंजम, ओडिशा) आणि ओंगा बिरा कोवासी (२८, रा. बोपनपल्ली, ता. कालीमेला, जि. मलकनगिरी, ओडिशा) यांना अटक केली. त्यांच्याकडून १७.४७५ किलो गांजा, चार मोबाईल आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ (NDPS Act) अंतर्गत बल्लारशा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास बल्लारशा पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT