चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीवर राजुरा येथील २२ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी गुन्हा आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
राजुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजुरा येथील आरोपीने तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला समाजमाध्यमावरून रिक्वेस्ट पाठविली होती आणि त्यानंतर या दोघांत चॅटिंग सुरू झाले. यानंतर दिनांक २५ जून २०२६ रोजी आरोपी अरबाज चाऊस या युवकाने तिला राजुरा येथे बोलावून तिला मित्राच्या घरी घेऊन गेला आणि तेथे तुझ्यावर माझे प्रेम असल्याचे मुलीला सांगून जबरीने अत्याचार केला.
या घटनेनंतर पीडित मुलगी घाबरून गेली आणि काही दिवसांनी तिने या प्रकाराची घरी माहिती दिली. यानंतर पालकांसह या मुलीने राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. राजुरा पोलिसांनी दिनांक ५ जुलै रोजी रात्री बलात्कार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली. पुढील तपास राजुरा ठाणेदार नितीन चिंचोळकर करीत आहेत.